नव्या धोरणाने कारकुनी अभियंते घडतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:27 IST2021-03-16T04:27:31+5:302021-03-16T04:27:31+5:30

ते म्हणाले की, अभियंता शिक्षण पूर्ण झालेल्‍या अनेक विद्यार्थांनी प्रॅक्‍टीकल अभ्‍यास केला नसल्‍याने या नवोदित अभियंत्‍यांना चांगल्या नोकऱ्यांसाठी मोठी ...

The new policy will make clerical engineers happen | नव्या धोरणाने कारकुनी अभियंते घडतील

नव्या धोरणाने कारकुनी अभियंते घडतील

ते म्हणाले की, अभियंता शिक्षण पूर्ण झालेल्‍या अनेक विद्यार्थांनी प्रॅक्‍टीकल अभ्‍यास केला नसल्‍याने या नवोदित अभियंत्‍यांना चांगल्या नोकऱ्यांसाठी मोठी कसरत करावी लागली. यामुळे त्‍यांचा मोठा भ्रमनिरास झाला आहे. आज अभियंता शिक्षणाकडे अनेक विद्यार्थांनी पाठ फिरविली आहे. महाविद्यालयांमध्‍ये त्‍यांच्‍या क्षमतेपेक्षा कमी विद्यार्थी प्रवेशित आहेत. त्‍यामुळेही अभियांत्रिकी महाविद्यालये भविष्‍यात बंद अवस्‍थेत आहेत. तर अनेक बंद पडण्‍याच्‍या स्थितीत आहेत. जी नावारुपाला आलेली महाविद्यालये आहेत त्‍यांना शासनाच्‍या नव्या शैक्षणिक धोरणाचा फटका बसल्‍यावाचून राहणार नाही.

फिजिक्‍स, केमिस्‍ट्री, मॅथ्‍स् विषय नसलेला अभियंता म्‍हणजे एक प्रकारचा कारकूनच म्‍हणावा लागेल. २१व्‍या शतकातील तांत्रिकी शिक्षणाच्‍या जगात दर्जेदार अभियंता हे देशाच्‍या प्रगतीचा कणा आहेत. या नवीन धोरणामुळे देशातील अभियांत्रिकी शिक्षण अडचणीत आल्‍याने देशाच्‍या प्रगतीमध्‍ये बाधा पोहोचेल.

ते म्हणाले की, काही विद्यार्थी या शासनाच्‍या निर्णयाचे स्‍वागत करीत आहेत परंतु त्‍यांनी हे लक्षात घ्‍यावे अभियांत्रिकी शिक्षाणाचा पाया असलेले फिजिक्‍स, केमिस्‍ट्री, मॅथ्‍स् हे विषय घेऊन झालेल्‍या अभियंत्‍यांची आज अवस्‍था बिकट आहे. तर या विषयांशिवाय नवोदित अभियंत्‍यांची काय अवस्‍था होईल. त्‍यामुळे सर्व अभियांत्रिकी संस्‍था चालकांनी, विद्यार्थांनी शासनाच्‍या या नवीन धोरणाचा निषेध करावा. ज्‍यांनी हे चुकीचे धोरण आणले त्‍यांनी समाजाला दर्जेदार अभियंते मिळण्यासाठी या शिक्षण प्रणालीचे धोरण बदलून पूर्ववत करावे.

Web Title: The new policy will make clerical engineers happen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.