दुधोंडी येथे ‘राजारामबापू’ दूध संघाचा नवीन प्लांट सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:20 IST2021-02-05T07:20:02+5:302021-02-05T07:20:02+5:30
दुधोंडी : दुधोंडी (ता. पलूस) येथील कृष्णाकाठ शेतमाल प्रक्रिया व साठवणूक संस्था या संस्थेमध्ये राजारामबापू पाटील सहकारी दूध ...

दुधोंडी येथे ‘राजारामबापू’ दूध संघाचा नवीन प्लांट सुरू
दुधोंडी : दुधोंडी (ता. पलूस) येथील कृष्णाकाठ शेतमाल प्रक्रिया व साठवणूक संस्था या संस्थेमध्ये राजारामबापू पाटील सहकारी दूध संघातर्फे कस्टर्ड बीएमसी अंतर्गत दुधाचा नवीन चिलिंग प्लांट सुरू करण्यात आला आहे. राजारामबापू दूध संघाचे अध्यक्ष विनायक पाटील व कृष्णाकाठ उद्योगसमूहाचे शिल्पकार जे.के. (बापू) जाधव यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले.
विनायक पाटील म्हणाले की, जे.के. (बापू) जाधव यांनी शून्यातून आपल्या संस्थांचे जाळे निमार्ण केले.* आहे. त्या संस्थांना टिकवण्याचे काम बापू व त्यांच्या परिवाराने अतिशय चांगल्या पद्धतीने केले.* आहे. त्यांच्या संस्थांना कुठेही गालबोट लागणार नाही. .* राजारामबापू दूध संघ फक्त वाळवा तालुक्यापुरता बोनस जाहीर करत असे; परंतु दुधोंडीसह परिसरामधील गावातील संस्थांना भविष्यकाळात बोनस .* दिला जाईल.
यावेळी मानसिंग बँकेचे अध्यक्ष सुधीर जाधव, क्रांतीकुमार जाधव, संदीप पाटील, सुनील नलवडे, उपसरपंच रवींद्र नलवडे, हणमंत कारंडे, संभाजी जाधव, आर.एस. पाटील, डी.बी. पाटील, संजय पाटील उपस्थित होते. अशोक भोसले यांनी स्वागत केले. दिगंबर जाधव यांनी आभार मानले.
फोटो-२४दुधोंडी१
फोटो ओळ:- दुधोंडी (ता. पलूस) राजारामबापू पाटील दूध संघाच्या डेअरी चिलिंग प्लांटचे उद्घाटन विनायक पाटील व जे.के. बापू जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुधीर जाधव उपस्थित होते.