शिराळा तालुक्यात एक नवीन रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:04 IST2020-12-05T05:04:54+5:302020-12-05T05:04:54+5:30

शिराळा : शिराळा तालुक्यात बुधवारी शिरशी येथे कोरोनाचा एक नवीन रुग्ण आढळून आला. बुधवारी दिवसभरात १०४ अँटिजेनच्या चाचण्या करण्यात ...

A new patient in Shirala taluka | शिराळा तालुक्यात एक नवीन रुग्ण

शिराळा तालुक्यात एक नवीन रुग्ण

शिराळा : शिराळा तालुक्यात बुधवारी शिरशी येथे कोरोनाचा एक नवीन रुग्ण आढळून आला. बुधवारी दिवसभरात १०४ अँटिजेनच्या चाचण्या करण्यात आल्या. तालुक्यात सध्या पाच रुग्ण असून त्या सर्वांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरु आहेत.

तालुक्यातील ९८ पैकी ९३ गावांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्के आहे. आजअखेर तालुक्यात १० हजार ४५० अँटिजेनच्या, तर ६ हजार ८३१ आरटीपीसीआरच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये २ हजार १८२ रुग्ण आढळून आले असून यापैकी २ हजार ७७ रुग्ण काेराेनामुक्त झाले आहेत. सध्या ५ रुग्ण हाेम आयसाेलेशनमध्ये उपचार घेत आहेत. आजअखेर शिराळा शहरातील १४ रुग्णांसह तालुक्यातील ९२ जणांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण ४.२ टक्के आहे.

Web Title: A new patient in Shirala taluka