नूतन पदाधिकाऱ्यांनी गावच्या विकासासाठी याेगदान द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:26 IST2021-01-20T04:26:55+5:302021-01-20T04:26:55+5:30

शिराळा : ऐतिहासिक बिळाशी गावाने निवडून दिलेल्या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांनी गावाचा विकासात्मक लौकिक वाढविण्यासाठी जास्तीत जास्त योगदान देण्याचा ...

New office bearers should contribute for the development of the village | नूतन पदाधिकाऱ्यांनी गावच्या विकासासाठी याेगदान द्यावे

नूतन पदाधिकाऱ्यांनी गावच्या विकासासाठी याेगदान द्यावे

शिराळा : ऐतिहासिक बिळाशी गावाने निवडून दिलेल्या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांनी गावाचा विकासात्मक लौकिक वाढविण्यासाठी जास्तीत जास्त योगदान देण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सत्यजित देशमुख यांनी केले.

बिळाशी ग्रामपंचायत निवडणुकीत विजय संपादन केलेल्या नवनिर्वाचित भैरवनाथ ग्रामविकास पॅनलच्या सदस्यांच्या सत्कारावेळी ते बोलत होते.

यावेळी माजी उपसभापती आनंदराव पाटील, विष्णू पाटील, एस. वाय. यमगर, माजी सरपंच बाजीराव पाटील, श्यामराव पाटील, बाजार समिती संचालक दिलीप कुंभार, सूर्यकांत शिंदे उपस्थित होते.

देशमुख म्हणाले. मागील दोन पंचवार्षिक निवडणुका बिनविरोध झाल्या. परंतु यावर्षी स्थानिक पातळीवर ही निवडणूक रंगतदार ठरली. सर्व अकरा जागांवर जनतेने विजय दिला आहे.

यावेळी सुवर्णा पाटील, सुवर्णा साळुंखे, सुजाता देशमाने, दत्तात्रय मगदूम, कल्पना यमगर, चंद्रकांत साळुंखे, विजय रोकडे उपस्थित होते.

फोटो : १९ शिराळा १

ओळ : बिळाशी (ता. शिराळा) येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार सत्यजित देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.

Web Title: New office bearers should contribute for the development of the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.