सांगलीच्या नूतन सदस्यांचे राजारामबापूंना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:28 IST2021-08-23T04:28:32+5:302021-08-23T04:28:32+5:30
राजारामनगर येथे लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्यास हरिदास पाटील, संगीता हारगे, मनगु सरगर यांनी अभिवादन केले. यावेळी महापौर दिग्विजय ...

सांगलीच्या नूतन सदस्यांचे राजारामबापूंना अभिवादन
राजारामनगर येथे लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्यास हरिदास पाटील, संगीता हारगे, मनगु सरगर यांनी अभिवादन केले. यावेळी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, शेडजी मोहिते, अभिजित हारगे, सचिन चव्हाण, धोंडीराम मोकाशी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेचे नूतन स्वीकृत सदस्य हरिदास पाटील, स्थायी समितीच्या नूतन सदस्या संगीता हारगे, मनगु सरगर यांनी राजारामबापू कारखाना कार्यस्थळावर राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी महापौर दिग्विजय सूर्यवंशी उपस्थित होते.
कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील, जयंत पाटील यांचे स्वीय सहायक मोहन चव्हाण यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. यावेळी नगरसेवक शेडजी मोहिते, अभिजित हारगे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यापारी सेलचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, धोंडीराम मोकाशी उपस्थित होते.