माध्यमांच्या प्रभावामुळे नवी पिढी वाचनापासून दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:19 IST2021-05-31T04:19:36+5:302021-05-31T04:19:36+5:30
सांगली : माहिती तंत्रज्ञानाच्या युगात अनेक माध्यमे अग्रेसर आहेत. त्यांची सकारात्मक बाजू निर्विवाद सत्य आहे. पण नवी पिढी ...

माध्यमांच्या प्रभावामुळे नवी पिढी वाचनापासून दूर
सांगली : माहिती तंत्रज्ञानाच्या युगात अनेक माध्यमे अग्रेसर आहेत. त्यांची सकारात्मक बाजू निर्विवाद सत्य आहे. पण नवी पिढी माध्यमांच्या प्रभावामुळे जंजाळात गुरफटून वाचनापासून दूर जात आहे. आजपर्यंत समाजातील महानुभावांचे भरणपोषण चांगल्या वाचनानेच झाले आहे, त्यामुळे मुले वाचनाकडे वळण्यासाठी पालकांनी विशेष प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक वैजनाथ महाजन यांनी केले.
हरीपूर येथे मोफत वाचनालयाच्या शतक महोत्सवानिमित्त ऑनलाईन व्याख्यानमालेत ‘वाचनानंद’ विषयावर प्रा. महाजन बोलत होते. त्यांनी प्र. के. अत्रे, वि. स. खांडेकर, विश्राम बेडेकर, व्यंकटेश माडगूळकर, उद्धव शेळके, चारुता सागर, दया पवार, नारायण सुर्वे, वामन निंबाळकर या साहित्यिकांच्या कथा, कादंबऱ्या, कविता यांचे संदर्भ देत वाचनाचा आनंद मिळवण्याविषयी विवेचन केले. प्रास्ताविक डॉ. जिज्ञासा परांजपे-दुदगीकर यांनी केले तर विठ्ठल मोहिते यांनी आभार मानले. या कार्यक्रमाचे संयोजन रोटरी समाज दल व हरीपूर ग्रामपंचायतीने केले.