शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

द्राक्षबागायदार शेतकऱ्यांवर नवे संकट; अवकाळीतून बचावलेल्या द्राक्षबागांवर आता वटवाघळांचे हल्ले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2022 13:34 IST

मिरज, कवठेमहांकाळ तालुक्यांतील शेतकऱ्यांवर हे नवे संकट ओढवले आहे. द्राक्षघडाच्या बचावासाठी बागांना जाळ्या मारण्यात येत आहेत.

सांगली : अवकाळीतून बचावलेल्या द्राक्षबागांवर आता वटवाघळांचे हल्ले सुरु झाले आहेत. मिरज, कवठेमहांकाळ तालुक्यांतील शेतकऱ्यांवर हे नवे संकट ओढवले आहे. द्राक्षघडाच्या बचावासाठी बागांना जाळ्या मारण्यात येत आहेत.सध्या द्राक्षमण्यांत साखर भरु लागली आहे. घड पक्व झाले आहेत. ही टपोरी द्राक्षे वटवाघळांच्या हल्ल्याचे बळी ठरु लागली आहेत. रात्री दहा-अकरानंतर वटवाघळांचे थवे बागेत घुसतात, रात्रभर धुमाकूळ घालतात. खाणे कमी, पण नासधुसच प्रचंड प्रमाणात करतात. सकाळी शेतकरी बागेत जातो, तेव्हा बागेत सर्वत्र विखरुन पडलेले द्राक्षघड दिसतात. एका रात्रीत दोन-तीन एकर बागेचा सुपडासाफ होतो.वटवाघळांपासून बचावासाठी बागांभोवती जाळी लपेटावी लागत आहे. यापूर्वी पक्ष्यांसाठी हलकी जाळी लावली जायची, पण वटवाघळांसाठी जाडसर जाळी लावावी लागत आहे. काही शेतकरी बागेत रात्रभर प्रखर दिवे लावून ठेवत आहेत. तीव्र प्रकाशापासून वटवाघळे दूर राहतात, बागेचा बचाव होतो. काही बागांत मोठ्या आवाजात गाणी लावण्याचा प्रयोगही शेतकऱ्यांनी  केला आहे.महामार्गासाठी वृक्षतोडीने वटवाघळे झाली सैरभैररत्नागिरी - नागपूर महामार्गासाठी ४७ हजारहून अधिक झाडे तोडण्यात आली. शंभर-दोनशे वर्षे जुन्या वडाच्या झाडांच्या गर्दीचा मिरज-पंढरपूर मार्ग वृक्षतोडीने उजाड झाला. हजारो वटवाघळांची आश्रयस्थाने नष्ट झाली. सैरभैर झालेली वटवाघळे महामार्गानजिकच्या गावांत शेतांतील झाडांवर मुक्कामाला येत आहेत. रात्री द्राक्षबागांमध्ये घुसत आहेत. महामार्गाच्या कामाचा हा विपरीत परिणाम शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे.

दलालांनी बागांचे करार केले आहेत. आम्ही आगाऊ रकमादेखील घेतल्या आहेत. दलालाकडून द्राक्षाची छाटणी होईपर्यंत  बाग जीवापाड सांभाळावी लागत आहे. वटवाघळांपासून बचावासाठी रात्रभर जागे रहावे लागत आहे.- रामगौंड पाटील, द्राक्ष शेतकरी, लक्ष्मीवाडी

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी