शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

मंताडा राजा दयानिधी सांगलीचे नवे जिल्हाधिकारी, अभिजित चौधरींची औरंगाबादला बदली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 17:01 IST

राज्यात शिंदे सरकार आल्यानंतर बदलीला स्थगिती देण्यात आली होती. पुन्हा नव्याने बदलीचे आदेश देण्यात आले.

सांगली : जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून डॉ. मंताडा राजा दयानिधी यांची शुक्रवारी शासनाने नियुक्ती केली. सध्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांची औरंगाबाद महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून बदली झाली आहे. गेल्या महिन्यात डॉ. चौधरी यांची बदली झाली होती. राज्यात शिंदे सरकार आल्यानंतर या बदलीला स्थगिती देण्यात आली होती. शुक्रवारी पुन्हा नव्याने बदलीचे आदेश देण्यात आले.

सांगलीच्या जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारणारे डॉ. मंताडा राजा दयानिधी मूळचे तेलंगणाचे असून त्यांचे शिक्षण एमबीबीएस झाले आहे. ते २०१४ बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. नाशिक जिल्ह्यातून त्यांनी सेवेस प्रारंभ केला, त्यानंतर ते चंद्रपूर येथे आदिवासी कल्याण विभागात कार्यरत होते. तेथून गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही त्यांनी काम केले. गोंदिया येथून त्यांची उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून काम केल्यानंतर आता ते सांगली जिल्ह्याची सूत्रे स्वीकारणार आहेत.सध्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांची औरंगाबाद महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. यापूर्वीही त्यांची याच पदावर बदली झाली होती.

२०१९ मध्ये डॉ. चौधरी यांनी जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली होती. सूत्रे स्वीकारल्यानंतर काही महिन्यांतच महापुरावेळी त्यांनी प्रभावी कामगिरी केली. त्यानंतरच्या महापूर आणि कोरोना कालावधीतही त्यांच्या कामाची सर्वत्र प्रशंसा झाली होती. स्वत: डॉक्टर असल्याने कोरोना कालावधीत त्यांनी रुग्णांवरील उपचारांचे चांगले नियोजन केले होते, त्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा व रुग्णांना बेड मिळण्याबाबत जिल्ह्यात कोणतीही अडचण आली नव्हती. स्वच्छ व पारदर्शी कारभारामुळे त्यांनी तीन वर्षांहून अधिक काळ जिल्ह्यात काम केले.

डॉ. चौधरी यांना पुन्हा औरंगाबादचगेल्या महिन्यात महाविकास आघाडी सरकारने जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांची औरंगाबादला आयुक्तपदी बदली केली होती, तर सांगलीच्या जिल्हाधिकारी म्हणून दीपा मुधोळ-मुंडे यांची नियुक्ती केली होती. मात्र, नव्या शिंदे सरकारने या बदलीस स्थगिती दिली होती. आता पुन्हा चौधरी यांना औरंगाबाद येथेच नियुक्ती देण्यात आली आहे.

लवकरच सूत्रे स्वीकारणार

बदलीचे आदेश प्राप्त झाले आहेत. कोरोना कालावधीत उल्हासनगर महापालिकेची सूत्रे स्वीकारली होती. लवकरच जिल्ह्याची सूत्रे स्वीकारणार असल्याचे नूतन जिल्हाधिकारी डॉ. मंताडा राजा दयानिधी यांनी ‘लाेकमत’ला सांगितले.

टॅग्स :Sangliसांगलीcollectorजिल्हाधिकारी