जीएसटीमधील नवीन बदल हे करदात्यांसाठी अधिक सुलभ : राजेंद्र मेढेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:21 IST2021-01-14T04:21:22+5:302021-01-14T04:21:22+5:30

ॲड्स हब या सांगलीमधील जाहिरात एजन्सीजच्या संघटनेने आयोजित केलेल्या चर्चासत्रात बोलताना त्यांनी ही माहिती दिली. राजेंद्र मेढेकर म्हणाले, जानेवारी ...

New changes in GST make it easier for taxpayers: Rajendra Medhekar | जीएसटीमधील नवीन बदल हे करदात्यांसाठी अधिक सुलभ : राजेंद्र मेढेकर

जीएसटीमधील नवीन बदल हे करदात्यांसाठी अधिक सुलभ : राजेंद्र मेढेकर

ॲड्स हब या सांगलीमधील जाहिरात एजन्सीजच्या संघटनेने आयोजित केलेल्या चर्चासत्रात बोलताना त्यांनी ही माहिती दिली. राजेंद्र मेढेकर म्हणाले, जानेवारी महिन्यापासून प्रामुख्याने ५ कोटींच्या आत उलाढाल असणाऱ्या करदात्यांसाठी हे महत्त्वाचे बदल झाले आहेत. करदात्यांना पूर्वी जीएसटीआर - ३बी हे रिटर्न प्रत्येक महिन्याच्या २0 तारखेपर्यंत भरावे लागत होते, ते आता तिमाही स्वरूपात सादर करण्याची सवलत लागू झाली आहे. यामध्ये करभरणा मात्र दरमहा करायचा आहे. यामुळे पूर्वी १२ रिटर्न होते ते आता फक्त ४ राहणार आहेत. जीएसटीआर - १ हे रिटर्न पूर्वीप्रमाणे तिमाहीच भरायचे आहे. तसेच आपण केलेली बिले आय. एफ. एफ. सुविधेद्वारे प्रत्येक महिन्याला अपलोड करण्याची सुविधा सुरू झाली आहे. यामुळे पुढील व्यापाऱ्यास आपल्या बिलातील करपरतावा सहजपणे उपलब्ध होईल.

उपस्थितांच्या विविध प्रश्नांना राजेंद्र मेढेकर यांनी सविस्तर उत्तरे दिले. चर्चासत्राचे आयोजन ॲड्स हब या जाहिरात एजन्सीजच्या संघटनेमार्फत केले होते. यावेळी प्रशांत कुलकर्णी, उमेश देसाई, प्रमोद गोसावी, भालचंद्र लिमये, मारुती गायकवाड, प्रकाश हुलवान, सुनील बेलेकर, सुधीर अनंतपूरकर, राजेश शहा, अविनाश दीक्षित, मिलिंद कदम, अमोल कुंचूर, अखिलेश पडियार आदी सभासद उपस्थित होते.

फोटो : १३ जीएसटी

ओळ : सांगलीत ॲड्स हबतर्फे आयाेजित जीएसटी चर्चासत्रात केंद्रीय जीएसटीचे निरीक्षक राजेंद्र मेढेकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी फेम या राज्यस्तरीय संघटनेचे सहसचिव व चतुरंग ॲडव्हर्टायझिंगचे प्रशांत कुलकर्णी उपस्थित हाेते.

Web Title: New changes in GST make it easier for taxpayers: Rajendra Medhekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.