हिंगणगाव बुद्रूकच्या नेहरू विद्यालयास आयएसओ मानांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:22 IST2021-02-08T04:22:42+5:302021-02-08T04:22:42+5:30

आयएसओ मानांकनासाठी विद्यालयातील स्कूल कमिटी सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी, पालक, उद्योजक, व्यावसायिकांच्या आर्थिक योगदानातून शाळेत अधिक भौतिक सुविधा ...

Nehru Vidyalaya of Hingangaon Budruk is ISO certified | हिंगणगाव बुद्रूकच्या नेहरू विद्यालयास आयएसओ मानांकन

हिंगणगाव बुद्रूकच्या नेहरू विद्यालयास आयएसओ मानांकन

आयएसओ मानांकनासाठी विद्यालयातील स्कूल कमिटी सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी, पालक, उद्योजक, व्यावसायिकांच्या आर्थिक योगदानातून शाळेत अधिक भौतिक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या. यामध्ये स्वच्छ शालेय परिसर, वाहन तळ, सर्व वर्गात लेक्चर टेबल, अद्ययावत संगणक कक्ष, वाचन कक्ष, बोलक्या भिंती, अद्ययावत स्टेज व्यवस्था, विद्यार्थ्यांना मोफत वाय-फाय व्यवस्था, प्रत्येक वर्गामध्ये वाचनाची गोडी वाढण्यासाठी वाचन पेटी, सुसज्ज प्रयोगशाळा, अद्ययावत शिक्षक कक्ष, संपूर्ण परिसर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षेत, मुलींचे झांज पथक, विविध खेळ खेळण्याची सुविधा, दुरदर्शनवरील कार्यक्रम पाहण्यासाठी स्मार्ट टीव्हीची सोय, मुख्य इमारतीसमोर प्रशस्त लाॅन इत्यादी सोयी-सुविधा करण्यात आल्या. याशिवाय विद्यालयाच्या गुणवत्तेत वाढ व्हावी यासाठी मुख्याध्यापक व शिक्षक प्रयत्नशील आहेत. यासाठी कडेगावचे गटशिक्षण अधिकारी अनिस नायकवडी, शिक्षण विस्तार अधिकारी विकास राजे व तोंडोलीचे केंद्रप्रमुख महापुरे यांचे मार्गदर्शन मिळाले.

Web Title: Nehru Vidyalaya of Hingangaon Budruk is ISO certified

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.