शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: चांदोली धरण, वारणा नदीतील दुर्घटना रोखणार कशी?; सुरक्षा व्यवस्थेची ऐशी-तैशी

By संतोष भिसे | Updated: May 11, 2024 16:01 IST

जलसंपदा विभागाला नाही गांभीर्य

आनंदा सुतारवारणावती : चांदोली पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी पायाभूत सुविधांचा स्तर उंचाविताना पर्यटकांच्या सुरक्षिततेकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. चांदोली धरण व सह्याद्री व्याघ्र प्रकल्प या पर्यटन स्थळाबरोबर धरणाच्या पायथ्याला निसर्गरम्य वातावरणात भोजन करण्याच्या व पोहण्याच्या उद्देशाने अनेक पर्यटक सहकुटुंब येतात. या ठिकाणी घडणाऱ्या दुर्घटना रोखणारी यंत्रणाच अस्तित्वात नाही. जलसंपदा विभागाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.धरणाच्या सांडव्यातून पाणी सोडले जाते, तेथून वारणा नदी पात्रात प्रवाहित होते. याठिकाणी पर्यटकांना पाण्यात किंवा नदी पात्रात उतरण्यास मज्जाव करण्याची यंत्रणा कार्यरत नाही. पर्यटक खुलेआम पाण्यात उतरतात. आनंद घेण्याच्या नादात स्वतःचा जीव गमावतात. जलसंपदा विभागाने याकडे सुरक्षेच्या नजरेने पाहिले नसल्यामुळे सुरक्षा रक्षक तैनात नाहीत. धोकादायक ठिकाणी सूचना फलक लावलेले नाहीत, तसेच नदी पात्रात किंवा सांडव्याजवळ पाण्यात उतरणाऱ्या हुल्लडबाजांवर अद्याप दंडात्मक कारवाई केली नसल्याने असे अनुचित प्रकार वारंवार घडत आहेत. तरीदेखील धोकादायक व दुर्घटनाग्रस्त ठिकाणच्या सुरक्षा व्यवस्थेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. अजून किती जीव गेल्यानंतर पाटबंधारे विभागाला जाग येणार आहे?धरणाच्या पायथ्याला सांडव्याजवळ वारणा नदी पात्रात आत्तापर्यंत अक्षय पाटील, राहुल मगदूम, तुषार कुंभार, सुधीर कांबळे, करण कळंत्रे व परवा अभिषेक मंडले, या सहा जणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यांना वाचवण्यात ग्रामस्थांना किंवा इतर उपस्थित पर्यटकांना यश आले नाही.चांदोली धरण व अभयारण्य महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे. सुटीच्या दिवशी पर्यटक गर्दी करतात. मौजमजा करताना पर्यटकांचे मृत्यू होत आहेत. वारंवार घडणाऱ्या दुर्घटना रोखण्यासाठी प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे स्थानिक नागरिक व पर्यटकांतून बोलले जात आहे.

शनिवारी व रविवारी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात ठेवावा. पाटबंधारे विभागाने दुर्घटनाग्रस्त व धोकादायक ठिकाणी सूचना फलक लावावे. संरक्षक भिंत किंवा तारेचे कुंपण करून याबाबत कायमस्वरूपी तोडगा काढणे आवश्यक आहे. - वसंत पाटील, माजी सरपंच, मणदूर 

शाहुवाडी तालुका हद्दीत नवीन पोलिस चौकीची इमारत बांधली आहे. तेथे वीज व पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे सुरक्षा रक्षकांची गैरसोय होते. नवीन चौकीजवळ प्रतिबंधात्मक फलक लावले आहेत. लवकरच सुरक्षारक्षक नेमण्यात येईल. - गोरख पाटील, शाखा अभियंता, वारणा पाटबंधारे विभाग, वारणावती.

टॅग्स :SangliसांगलीDamधरणriverनदी