शिवपुरी-कामेरी रोड नजीकचा नीळकंठ बंधारा फुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:19 IST2021-06-18T04:19:20+5:302021-06-18T04:19:20+5:30

शिवपुरी-कामेरी रोड नजीकचा नीळकंठ बंधारा फुटला आहे. लोकमत न्यूज नेटवर्क कामेरी : कामेरी-शिवपुरी रोडजवळ असणाऱ्या नीळकंठ मळ्या शेजारच्या बंधाऱ्यात ...

The Neelkanth dam near Shivpuri-Kameri road burst | शिवपुरी-कामेरी रोड नजीकचा नीळकंठ बंधारा फुटला

शिवपुरी-कामेरी रोड नजीकचा नीळकंठ बंधारा फुटला

शिवपुरी-कामेरी रोड नजीकचा नीळकंठ बंधारा फुटला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

कामेरी : कामेरी-शिवपुरी रोडजवळ असणाऱ्या नीळकंठ मळ्या शेजारच्या बंधाऱ्यात गळतीमुळे पाणीसाठा होत नव्हता म्हणून शेतकऱ्यांच्या मागणीवरून जिल्हा परिषद सदस्या सुरेखा जाधव यांनी प्रयत्न करून बंधारा दुरुस्तीसाठी चार लाखाचा निधी मंजूर करून आणला होता. ठेकेदाराने चार दिवसापूर्वी दुरुस्तीच्या कामासाठी साहित्य आणून टाकले होते. मात्र दोन दिवस पडणाऱ्या जोराच्या पावसाने बंधारा फुटला आहे. हा बंधारा ४० वर्षांपूर्वीचा असून अरुंद होता. बुधवारच्या जोरदार पावसाने बंधाऱ्याच्या पूर्वीच्या बांधकामातील काही दगड निसटून गेल्याने तो मधोमध फुटला आहे. त्यामुळे आता दुरुस्तीऐवजी त्याठिकाणी नवीन बंधारा बांधकामासाठी भरीव निधी उपलब्ध करावा, अशी मागणी कामेरी व शिवपुरी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

Web Title: The Neelkanth dam near Shivpuri-Kameri road burst