नैसर्गिक संसाधनांचा वापर जपून करण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:48 IST2021-02-06T04:48:37+5:302021-02-06T04:48:37+5:30
भारत सरकारचे पेट्राेलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय व पेट्राेलियम संरक्षण संस्थेतर्फे ‘सक्षम २०२१’ उपक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत पेट्राेलियम ...

नैसर्गिक संसाधनांचा वापर जपून करण्याची गरज
भारत सरकारचे पेट्राेलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय व पेट्राेलियम संरक्षण संस्थेतर्फे ‘सक्षम २०२१’ उपक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत पेट्राेलियम संरक्षण संशाेधन संस्था व इंडियन ऑइल मिरज यांच्यातर्फे सांगलीतील पाेदार इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये ‘नूतनीकरण ऊर्जा जिवाश्म इंधनाची जागा घेऊ शकेल का?’ या विषयावर आयाेजित वादविवाद स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी बाेलत हाेते. ‘स्वच्छ व पर्यायी इंधन ऊर्जा’ या संकल्पनेवर ही स्पर्धा पार पडली. यावेळी इंडियन ऑइलच्या मिरज डेपाेचे सहायक व्यवस्थापक राकेशकुमार राणा. वरिष्ठ अधिकारी घनश्यामसिंग भाैर्या. विद्यालयाचे प्राचार्य जी. बी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती हाेती.
यावेळी जी. बी. पाटील म्हणाले. वादविवाद स्पर्धेसारख्या उपक्रमातून विद्यार्थ्यंची बाैद्धिक क्षमता वाढते.
स्पर्धेत प्रथमेश पैलवान. मजुरेश पुजारी यांनी प्रथम. सुहानी सारडा. आर्यन पुजारी यांनी द्वितीय. आश्लेषा वाघंबरे. श्रुतीका सांडभाेर यांनी तृतीय क्रमांक मिळविला. भारत पेट्राेलियमचे विराट नंदा. मिलिंद लभाने यांनी पंच म्हणून काम पाहिले. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते इंडियन ऑइल चषक व प्रमाणपत्र देऊन गाैरविण्यात आले. या उपक्रमासाठी उपप्राचार्य नीरज राय. प्रशासक बजरंग पाटील यांचे सहकार्य लाभले.
फाेटाे : ०५पाेदार