देवराष्ट्रेसाठी स्वतंत्र पाणी योजनेची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:28 IST2021-08-23T04:28:44+5:302021-08-23T04:28:44+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क देवराष्ट्रे : देवराष्ट्रे (ता. कडेगाव) गावासाठी असणारी कुंडल प्रादेशिक पाणी योजना देवराष्ट्रेच्या नागरिकांसाठी व ...

देवराष्ट्रेसाठी स्वतंत्र पाणी योजनेची गरज
लाेकमत न्यूज नेटवर्क
देवराष्ट्रे : देवराष्ट्रे (ता. कडेगाव) गावासाठी असणारी कुंडल प्रादेशिक पाणी योजना देवराष्ट्रेच्या नागरिकांसाठी व गावासाठी खर्चीक बनली आहे. या योजनेव्दारे वेळेत पाणीपुरवठा होत नाही. उलट अवाचे सव्वा पाणीपट्टीमुळे देवराष्ट्रेचे ग्रामस्थ हैराण झाले आहेत. यासाठी गावाला स्वतंत्र पाणीपुरवठा करणारी ग्रामपंचायतीच्या स्व-मालकीची पाणीपुरवठा योजना सुरू करण्याची गरज व्यक्त हाेत आहे.
दुष्काळाने ग्रासलेल्या देवराष्ट्रेकरांना १९७२ साली यशवंतराव चव्हाण यांनी कुंडल पाणी योजनेतून पिण्याचे पाणी दिले; पण ही योजना आता देवराष्ट्रेच्या ग्रामस्थांसाठी महाग झाली आहे. याशिवाय वेळेत पाणीपुरवठा होत नाही. यामुळे गावासाठी स्वतंत्र विहीर खाेदून नवीन पाणी याेजना करणे गरजेचे आहे. यासाठी ग्रामपंचायतीकडे निधीही शिल्लक आहे. विशेष घटक योजनेतून खाेदलेली विहीर व जलवाहिनी निकृष्ट कामामुळे चर्चेत आली होती. पण सर्वांनी एकत्र येऊन संपूर्ण गावासाठी एक स्वतंत्र पाणी योजना राबविणे गरजेचे आहे. ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांनी देवराष्ट्रे गावाच्या विकासासाठी कोट्यवधीचा निधी दिला. त्यातून विकासात्मक कामे झाली; पण गावची स्वत:ची पाणी याेजना नसल्याने ग्रामस्थांचे हाल हाेत आहेत. कृषिमंत्री विश्वजित कदम यांच्या सहकार्यातून नवीन याेजना स्थापन करून गावचा पाणीप्रश्न साेडवावा, अशी मागणी हाेत आहे.