वाचनसंस्कृती वाढविण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:30 IST2021-08-13T04:30:12+5:302021-08-13T04:30:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क विटा : मानवी जीवन यशस्वी व सुसंस्कृत करण्यासाठी आणि अधिक सुदृढ व निरोगी बनविण्यासाठी अधिकच्या संवादाची ...

वाचनसंस्कृती वाढविण्याची गरज
लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : मानवी जीवन यशस्वी व सुसंस्कृत करण्यासाठी आणि अधिक सुदृढ व निरोगी बनविण्यासाठी अधिकच्या संवादाची आवश्यकता आहे. हे करण्यासाठी वाचन, चिंतन व मनन करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. भाऊसाहेब कोरे यांनी केले.
विटा येथील आदर्श महाविद्यालयात ग्रंथालय विभागाच्या वतीने डॉ. एस. आर. रंगनाथन यांचा जन्मदिवस ‘ग्रंथपाल दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ. कोरे बोलत होते.
प्राचार्य डॉ. कोरे यांनी वाचनामुळे माणसाच्या व्यक्तिमत्त्वात सर्वांगीण बदल घडत असतो. त्यामुळे प्रत्येक अडचणीवर पर्याय काढण्याचे सामर्थ्य माणसांमध्ये निर्माण होत असल्याचे सांगितले.
यावेळी ग्रंथपाल शिरीष खुरूद यांनी, सुसंस्कृत समाजासाठी शालेय शिक्षणाबरोबरच निरंतर शिक्षणदेखील आवश्यक आहे याचे महत्त्व डॉ. रंगनाथन यांनी सर्वप्रथम सर्वांना पटवून दिले. त्यांनीच ग्रंथालयाच्या माध्यमातून वाचन या संकल्पनेचा विकास व प्रसार करून देशातील सर्वांना ज्ञानाची कवाडे विनामूल्य खुली झाली पाहिजेत, याचसाठी आग्रह धरला. या संदर्भात रंगनाथन यांचे काम महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमासाठी ग्रंथालय विभागातील प्रा. एस. जे. शिंदे, प्रा. आर. एन. संदे, डॉ. यू. एल. थोरात, डॉ. एम. डी. चिन्ने, प्रा. आर. वाय. निकम, बरकत मुलाणी, आदी उपस्थित होते.