कोरोना रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:35 IST2021-04-30T04:35:23+5:302021-04-30T04:35:23+5:30
येथील पाटीलमळा, चव्हाणमळा व पांढरेवाडी परिसरात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने सरपंच वृषाली पाटील यांनी आपत्ती ...

कोरोना रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज
येथील पाटीलमळा, चव्हाणमळा व पांढरेवाडी परिसरात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने सरपंच वृषाली पाटील यांनी आपत्ती व्यवस्थापन समिती सदस्यांच्यासमवेत वाड्यावस्त्यांवर जाऊन नागरिकांच्या घरी प्रत्यक्ष भेटी दिल्या. नागरिकांच्या तब्येतीची विचारपूस केली व नागरिकांना दिलासा दिला तसेच आरोग्याची काळजी घेण्याच्या सूचना केल्या व ज्या ठिकाणी कोरोना रुग्ण होम आयसोलेशनमध्ये राहत आहेत त्या ठिकाणी प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून पोस्टर लावण्यात आले.
पांढरेवाडी येथे सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून नागरिकांच्या समवेत आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक घेतली.
यावेळी ॲड. धनंजय पाटील, उपसरपंच प्रा. अंकुश कोळेकर, विजय पाटील, प्रदीप लांडगे, तलाठी सुधाकर केंगार, ग्रामसेवक दत्तात्रय गोसावी, ज्योत्सना यादव, मनिषा पाटील उपस्थित होते.