‘राष्ट्रवादी’चे वालचंद महाविद्यालयाला निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:31 IST2021-07-14T04:31:41+5:302021-07-14T04:31:41+5:30
संजयनगर : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयाला परीक्षा फीबाबत निवेदन देण्यात आले आहे. यामध्ये परीक्षा अर्ज भरण्यासाठी ...

‘राष्ट्रवादी’चे वालचंद महाविद्यालयाला निवेदन
संजयनगर : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयाला परीक्षा फीबाबत निवेदन देण्यात आले आहे. यामध्ये परीक्षा अर्ज भरण्यासाठी फी भरण्याची सक्ती करून परीक्षेला बसण्यासाठी अडवणूक करू नये. शैक्षणिक शुल्कामध्ये आढळलेल्या तफावतीबाबत खुलासा करण्याची मागणी केली आहे.
शहर जिल्हाध्यक्ष शुभम जाधव म्हणाले, कोरोनाच्या काळामध्ये अनेक पालकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे परीक्षेला बसण्यासाठी विद्यार्थ्यांना फी भरण्याची सक्ती करू नये, तसेच शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ मध्ये महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कात तफावत आढळली आहे. याबाबत दोन दिवसांत खुलासा मिळाला नाही, तर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी शुभम ठोंबरे, ऋषिकेश कांबळे, संमेद पाटील, तेजस पाटील, अमोल पाटील, अनिकेत भंडारे, प्रीतम भिसे आदी उपस्थित होते.
120721\img-20210712-wa0025.jpg
पवार निधन वार्ता फोटो.