तासगाव तालुक्यात राष्ट्रवादीच ‘लय भारी’ (चौकट :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:28 IST2021-01-19T04:28:47+5:302021-01-19T04:28:47+5:30

अतुल पाटील यांचा विजय समजले नाही...तपासावे) तासगाव : तासगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणसंग्रामात राष्ट्रवादीच लय भारी ठरली असून, निवडणूक ...

NCP's 'rhythm heavy' in Tasgaon taluka (Frame: | तासगाव तालुक्यात राष्ट्रवादीच ‘लय भारी’ (चौकट :

तासगाव तालुक्यात राष्ट्रवादीच ‘लय भारी’ (चौकट :

अतुल पाटील यांचा विजय समजले नाही...तपासावे)

तासगाव : तासगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणसंग्रामात राष्ट्रवादीच लय भारी ठरली असून, निवडणूक लागलेल्या ३६ पैकी १६ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सुमन पाटील यांच्या समर्थकांनी सत्ता मिळवली आहे. ९ ग्रामपंचायतींमध्ये खासदार संजय पाटील समर्थकांची सत्ता आली आहे, तर ११ ग्रामपंचायतींमध्ये संमिश्र पॅनल सत्तेत आले आहेत.

तालुक्यातील ३९ पैकी १९ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे. सहा ग्रामपंचतायतींमध्ये आमदार सुमन पाटील समर्थकांनी खासदार समर्थकांच्या ताब्यातून सत्ता काढून घेतली. तर तीन ग्रामपंचायतींमध्ये खासदार समर्थकांनी आमदार गटाकडून सत्ता हस्तगत केली.

निवडणूक लागलेल्या ३९ पैकी कौलगे, लोकरेवाडी, नरसेवाडी या तीन गावांत राष्ट्रवादीच्या वर्चस्वात बिनविरोध सत्ता आली होती. सोमवारी झालेल्या मतमोजणीवेळी मांजर्डे, सावळज, गोटेवाडी, दहीवडी, पाडळी, विजयनगर, लोढे, गव्हाण, डोंगरसोनी, जरंडी, वडगाव, राजापूर, शिरगाव (वि.), यमगरवाडी, आळते, वज्रचौंडे ग्रामपंचायतींमध्ये आमदार सुमन पाटील समर्थक पॅनलचा विजय झाला आहे. धामणी, धुळगाव, हातनोली, पेड, वाघापूर, मोराळे, बोरगाव, जुळेवाडी, हातनूर या गावांमध्ये खासदार समर्थक पॅनलने बाजी मारली आहे. येळावी, विसापूर, ढवळी, सिद्धेवाडी, धोंडेवाडी, तुरची, कवठेएकंद, नागाव (क.), निंबळक, डोर्ली, गौरगाव या गावांमध्ये संमिश्र पॅनलची सत्ता आली आहे.

जिल्हा परिषद सदस्य सागर पाटील आणि प्रमोद शेंडगे यांना त्यांच्या सावळज व पेड ग्रामपंचायतींत सत्ता मिळवण्यात यश आले आहे, तर संजय पाटील यांची तुरची गावातून सत्ता गेली. अर्जुन पाटील यांनी खासदार गटाशी हातमिळवणी करून विसापूूर गावातील सत्ता कायम ठेवली आहे.

पंचायत समिती सदस्य सुनील जाधव यांनी आपल्या हातनोली ग्रामपंचायतीत सत्ता मिळवण्यात यश मिळवले, तर संतोष आठवले यांनी किंगमेकरची भूमिका बजावत कवठेएकंदमध्ये शेतकरी कामगार पक्षाशी युती करून ग्रामपंचायतीत सत्ता मिळवली. उमेश पाटील यांना येळावी ग्रामपंचायतीत सत्ता मिळवण्यात अपयश आले, तर माजी उपसभापती संभाजी पाटील यांच्या बोरगाव गावातील सत्ता खासदार समर्थकांच्या ताब्यात गेली.

चौकट :

मांजर्डे, सावळज, येळावीत भाजपला, कवठेएकंद, पेडमध्ये राष्ट्रवादीला धक्का :

जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिनकरदादा पाटील आणि तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत पाटील यांच्या पश्चात पहिल्यांदाच मांजर्डे आणि सावळजमध्ये ग्रामपंचायत निवडणूक होत होती. त्यामुळे या दोन्ही गावांकडे लक्ष लागून राहिले होते. मांजर्डेत राष्ट्रवादीच्या गटाने एकहाती सत्ता मिळवत भाजपचा पराभव केला, तर जिल्हा परिषद सदस्य सागर पाटील यांनी सावळजमध्ये काका गटाच्या ताब्यातून स्वबळावर सत्ता खेचून आणली.

येळावीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संमिश्र पॅनलने भाजपची सत्ता खेचून आणली. पेड आणि कवठेएकंदमध्ये राष्ट्रवादीला धक्का बसला आहे. कवठेएकंदमध्ये राष्ट्रवादीला धूळ चारून भाजप आणि शेकाप सत्तेत आले आहेत.

चौकट :

अतुल पाटील यांचा विजय

दोन दिवसांपूर्वी ढवळी येथील तत्कालीन उपसरपंच अतुल पाटील यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले होते. यावेळीही ते निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यांचा एकहाती विजय झाला.

Web Title: NCP's 'rhythm heavy' in Tasgaon taluka (Frame:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.