राष्ट्रवादीच्या नगरसेवकावर हल्ला

By Admin | Updated: September 7, 2014 00:19 IST2014-09-07T00:16:47+5:302014-09-07T00:19:49+5:30

एकास अटक : दुचाकीची मोडतोड; रस्त्याच्या प्रलंबित कामावरून कृत्य

NCP's corporator attacked | राष्ट्रवादीच्या नगरसेवकावर हल्ला

राष्ट्रवादीच्या नगरसेवकावर हल्ला

आपल्या लाडक्या बाप्पाला वाजत-गाजत निरोप देण्यासाठी शहरातील पाचही मानाच्या गणपती मंडळांसह इतर प्रमुख सार्वजनिक गणोश मंडळांनी जय्यत तयारी केली आहे. यंदाही ढोल-ताशाचा दणदणाट, आकर्षक देखावे, सामाजिक प्रबोधनपर पथके, पथनाटय़े ही मिरवणुकीतील आकर्षणो असणार आहेत. मिरवणूक लवकर संपावी यासाठीही मंडळे प्रयत्न करणार आहेत. 
 
मानाचा पहिला श्री कसबा गणपती 
सकाळी नऊ वाजात नीलेश पारसेकर यांच्या हस्ते उत्तर पूजा करून उत्सव मंडपातून मिरवणूक निघेल. टिळक पुतळ्याजवळ सकाळी 1क्.3क् वाजता महापौर चंचला कोद्रे यांनी टिळक पुतळ्याला हार घातल्यानंतर मुख्य मिरवणुकीला सुरुवात होईल. सकाळी 11 वाजता मिरवणूक बेलबाग चौकात येऊन लक्ष्मी रस्त्यावरील मुख्य मिरवणुकीला सुरुवात होईल.  दु. 3.2क् वाजता ‘श्रीं’चे विसजर्न केले जाईल. दरवर्षीप्रमाणो पारंपरिक पालखीतून ‘श्रीं’ची मिरवणूक निघेल. मिरवणुकीपुढे देवळणकर बंधूंचे नगारावादन तर गायकवाड बंधूंचे सनईवादन असेल. कामायनी या संस्थेतील मुलांचे पथकही आकर्षण असेल. 
 
मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणपती
उत्सव मंडपातून मिरवणूक सकाळी 1क्.3क् च्या दरम्यान टिळक चौकात पोहचेल. आकर्षक चांदीच्या रथात श्रींची मूर्ती विराजमान झालेली असेल. या वर्षी मराठी कलाकारांचे ढोल पथक मिरवणुकीतील आकर्षण ठरणार आहे. कलाकारांचे ढोल पथक यात सामील होणार असून, यामध्ये श्रुती मराठे, सौरभ गोखले, नेहा पेंडसे असे सुमारे चाळीस कलाकार सहभागी होणार आहेत. या मिरवणुकीत पाणी बचतीचा संदेशही देण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त मिरवणुकीत शिवमुद्रा कला मंच हे  पथक तर न्यू गंधर्व हे बँड पथक असेल.
 
मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपती
सकाळी 9.3क् वाजता उत्सव मंडपातून मिरवणुकीला सुरुवात होईल. त्यानंतर टिळक पुतळ्यापासून सकाळी 1क्.3क् वाजता मुख्य मिरवणुकीत सहभागी होणार आहे.
सुभाष सरपाले यांनी तयार केलेल्या विविधरंगी फुलांचा मयूर रथ मिरवणुकीतील आकर्षण असेल. तसेच जयंत नगरकर यांचे नगारावादन, नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेचे मिलिटरी बँड पथक तसेच चेतक, नादब्रrा व शिवगजर्ना ही तीन ढोल-ताशा पथके असतील. मिरवणुकीत दरवर्षीप्रमाणो गुलालाची उधळण केली जाणार आहे. मात्र त्याचे प्रमाण कमी असेल.
 
मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपती
विविधरंगी फुलांनी सजविलेला मयूर रथ आणि या रथावर असलेली 25 फूट उंचीची श्रींची मनमोहक मूर्ती यंदाच्या मिरवणुकीतील आकर्षण असेल. दरवर्षीप्रमाणो टिळक पुतळ्यापासूनच मिरवणुकीला सुरुवात होईल. मिरवणुकीत लोणकर बंधू यांचे नगारावादन, स्वरूपवर्धिनी, गजलक्ष्मी आणि रामवाडी येथील हिंद मंडळाचे ढोल-ताशा पथक असणार आहे. स्वरूपवर्धिनी पथकातील मुले मल्लखांबाची प्रात्यक्षिके दाखविणार आहेत. पुणो डॉक्टर्स असोसिएशनचे पथकही मिरवणुकीत सहभागी होणार असून, ते स्वच्छता, पाणी अशा विषयांवर जनजागृती करणार आहेत.
 
मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती
टिळक पुतळ्यापासून सकाळी 11 वाजता मिरवणुकीला सुरुवात होईल. मागील वर्षीप्रमाणो यंदाही मिरवणूक लक्ष्मी रस्त्यानेच जाणार आहे. फुलांनी सजविलेल्या रथात पारंपरिक पालखीमध्ये ‘श्रीं’ची मूर्ती असेल. यंदाच्या मिरवणुकीत सर्वात पुढे बिडवे बंधू यांचे नगारावादन असून, त्यानंतर नादब्रrा, शिवमुद्रा आणि श्रीराम ही ढोल-ताशा पथके असणार आहेत. लोकमान्य टिळकांची मंडाले तुरूंगातून सुटका होण्याच्या ऐतिहासिक घटनेला यंदा शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त इतिहासप्रेमी मंडळातर्फे या घटनेवर आधारित एक चित्ररथ तयार केला आहे. 
 
भाऊ रंगारी गणपती मंडळ
मिरवणुकीमध्ये 123 वर्षाचा पारंपरिक आकर्षक रथ यंदाही आकर्षण ठरणार आहे. या रथाला दोन बैलजोडय़ा असतील. टिळक पुतळ्याजवळ सायंकाळी 7 वाजता मिरवणुकीला सुरुवात होईल. भरतकुमार खळदकर यांचे नगारावादन सर्वात पुढे असेल. त्यानंतर श्रीराम, आवर्तन व रुद्रगजर्ना या ढोल-ताशा पथकांचा मिरवणुकीत समावेश आहे. यंदा मिरवणुकीत एलईडी स्क्रीनवरून स्त्रीभ्रूणहत्या, पाणी वाचवा, पर्यावरण या विषयांवर सामाजिक संदेश दिले जाणार आहेत. 
 
दगडूशेठ हलवाई गणपती 
दरवर्षीप्रमाणो यंदाही दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या ‘श्रीं’ची मिरवणूक वैभवशाली असेल. रंगांची उधळण करणारा मयूरेश्वर रथ मिरवणुकीतील मुख्य आकर्षण असणार आहे. विवेक खटावकर यांनी त्याची रचना केली असून, राजस्थानी कलाकारांनी त्यात रंग भरले आहेत. या रथावर एकूण 72 मोर आहेत. मोरांच्या चोचींमध्ये मोत्याच्या माळा असतील. श्रींच्या मागील बाजूस खास मोरपिसांची प्रभावळ केलेली आहे. या रथाला आकर्षक रंगांनी रंगविले असून, विद्युत रोषणाई असणार आहे. 
 
अखिल मंडई मंडळ
मिरवणुकीसाठी साकारण्यात आलेला विश्वविजेता रथ आकर्षण असेल. सायंकाळी सात वाजता मंडळाची मिरवणूक सुरू होईल. रथावर पुढे पाच सिंह असतील. रथाच्या मागे भारताचा नकाशा लावण्यात येणार आहे. रथावर श्रीराम यांचे युद्धातील प्रसंग तसेच श्रीकृष्ण यांचेही युद्धातील प्रसंग चित्रीत केलेले आहेत. विशाल ताजणोकर यांनी हा रथ साकारला आहे. रथापुढे शिवगजर्ना ढोल-ताशा पथक व संगम बँड पथक असणार आहे. 
 
बाबू गेनू मंडळ 
मिरवणुकीत यंदा गणोश रथ साकारला आहे. सहा खांबांवर अष्टकोनी कळस तयार केला जाणार असून, नितीन देसाई यांची रथाची कल्पना आहे.  रथावर यंदा सुरक्षेच्या दृष्टीने सहा सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. मिरवणुकीत शिवतेज व गजलक्ष्मी ही ढोल-ताशा पथके असतील.
 

 

Web Title: NCP's corporator attacked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.