आबांच्या वचनपूर्तीसाठी राष्ट्रवादीचे आंदोलन

By Admin | Updated: June 13, 2017 23:46 IST2017-06-13T23:46:22+5:302017-06-13T23:46:22+5:30

आबांच्या वचनपूर्तीसाठी राष्ट्रवादीचे आंदोलन

NCP's agitation for the sake of commitment | आबांच्या वचनपूर्तीसाठी राष्ट्रवादीचे आंदोलन

आबांच्या वचनपूर्तीसाठी राष्ट्रवादीचे आंदोलन


लोकमत न्यूज नेटवर्क
तासगाव : तासगाव नगरपालिकेतर्फे जलतरण तलावाचे लोकार्पण खासदार संजयकाका पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. मात्र हा तलाव माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या प्रयत्नामुळेच झाला आहे, भाजपकडून याचे श्रेय लाटले जात आहे, हे दाखवून देण्यासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आबांच्या नावाचे फलक घेऊन जलतरण तलावातच आंदोलन केले.
यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी या तलावाचे श्रेय खासदार संजयकाका पाटील यांना दिले. मात्र या कामाचे खरे श्रेय आर. आर. पाटील यांचेच असून, आबांनी दिलेल्या वचनाची पूर्ती झाली असल्याचे सांगत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तलावात उतरुन भाजपच्या श्रेयवादाला विरोध केला. आबांची वचनपूर्ती झाल्याचे फलक घेऊन तलावात हे आंदोलन केले.
यावेळी राष्ट्रवादीचे स्वप्नील जाधव, कमलेश तांबेकर, अमोल शिंदे, अक्षय शिंदे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
कोटीचा निधी
जलतरण तलावासाठी आर. आर. पाटील यांच्या प्रयत्नातून एक कोटीचा निधी मिळाला होता. त्यांच्या योगदानामुळेच जलतरण तलाव झाला. मात्र संजयकाका पाटील यांच्या उपस्थितीत हा तलावाचे लोकार्पण करण्यात आले.

Web Title: NCP's agitation for the sake of commitment