जतमध्ये केंद्रसरकरच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:18 IST2021-07-04T04:18:44+5:302021-07-04T04:18:44+5:30

जत : जतमध्ये शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देशातील इंधन दरवाढ व महागाई विरोधात आंदोलन करत केंद्र सरकारचा निषेध करण्यात ...

NCP's agitation against the central government in Jat | जतमध्ये केंद्रसरकरच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे आंदोलन

जतमध्ये केंद्रसरकरच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे आंदोलन

जत : जतमध्ये शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देशातील इंधन दरवाढ व महागाई विरोधात आंदोलन करत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.

सध्या घरगुती गॅस सिलिंडरची किंमत वाढून ८४७ रुपये झाली आहे. याचा सामान्य नागरिकांना फटका बसत आहे. पेट्रोलचा दर १०५ रुपयांच्या पुढे गेला आहे. डिझेलही शंभरीचा पल्ला गाठत आहे. याचे केंद्रातील मोदी सरकारला फारसे देणे-घेणे नाही. सर्वसामान्य माणसाच्या तोंडचे अन्नही आता भाजप सरकारने हिरावून घेतले आहे. हेच का त्यांचे अच्छे दिन. आज केंद्रात सत्ता असलेले भाजपचे लोक एकेकाळी इंधन दरवाढीवरून आकाश-पाताळ एक करायचे. सरकारच्या नावाने खडे फोडायचे. आता त्या कालखंडाच्या दुप्पट-तिप्पट इंधनाचे दर झालेत. परंतु, केंद्र सरकार दरवाढीचे नियमन करायला तयार नाही. इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य माणसांचे कंबरडे मोडले आहे. तरी मोदी सरकार याकडे गांभीर्याने पाहायला तयार नाही, असा आरोप आंदोलकांनी यावेळी केला.

यावेळी ज्येष्ठ नेते सुरेश शिंदे, तालुका अध्यक्ष रमेश पाटील, कार्याध्यक्ष उत्तमशेठ चव्हाण, सिद्धू शिरशाड, बसवराज धोडमनी, मच्छिंद्र वाघमोडे, माजी सभापती शिवाजी शिंदे, उपनगराध्यक्ष आप्पा पवार, नगरसेवक स्वप्निल शिंदे, आदी उपस्थित होते.

030721\img_20210703_153249.jpg

महागाई विरोधात केंद्रसरकरच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने Gजतमध्ये आंदोलन

Web Title: NCP's agitation against the central government in Jat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.