कवठेमहांकाळला राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रिचार्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:23 IST2021-02-08T04:23:04+5:302021-02-08T04:23:04+5:30
शिरढोण : कवठेमहांकाळ तालुक्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते पक्षाच्या कामात थंडावले आहेत. यामुळे त्यांना रिचार्ज करण्यासाठी पालकमंत्री जयंत पाटील ...

कवठेमहांकाळला राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रिचार्ज
शिरढोण : कवठेमहांकाळ तालुक्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते पक्षाच्या कामात थंडावले आहेत. यामुळे त्यांना रिचार्ज करण्यासाठी पालकमंत्री जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील, माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील व महांकाली साखर कारखान्याचे अध्यक्ष व दिवंगत नेते विजयराव सगरे यांचे पुत्र शांतनू सगरे यांनी तालुक्याचा शुक्रवारी झंझावाती दौरा केला.
तालुक्यात सध्या राजकीय वातावरण शांत आहे. राष्ट्रवादीचे नेमके कोण कार्यकर्ते आहेत. हा तालुक्यातील एक चर्चेचा प्रश्न आहे. अनेक निष्ठावान कार्यकर्ते पक्षातील गटा तटाच्या राजकारणामुळे मंदावले आहेत.
अशा स्थितीत उत्साही कार्यकर्ते सध्या पक्ष कार्यासाठी इच्छुक आहेत. त्यांना या तीन युवा नेत्यांबाबत आशा लागून आहे.
हिंगणगाव येथे शांतनू सगरे मित्र परिवाराच्या वतीने शुक्रवारी क्रीडा स्पर्धाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी हे तिन्ही युवा नेते उपस्थित होते. या दौऱ्यात त्यांनी सर्वसामान्यांना व युवक कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या दौऱ्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रिचार्ज झाले असून त्यांना राज्य स्तरावरच्या युवा नेत्यांचे बळ मिळाल्याने तालुक्यात भविष्यात राष्ट्रवादीला आणखीन चांगले दिवस येणार याची तालुक्यात चर्चा सुरू आहे.
चाैकट
सक्षम नेतृत्वाची अपेक्षा
सध्या कवठेमहांकाळ शहराध्यक्ष महेश पाटील यांनी शहरात युवकांना पक्षाशी जोडले आहे. युवक तालुका अध्यक्ष मोहन खोत, शहराध्यक्ष महेश पाटील, गणेश पाटील, अमर शिंदे, वामन कदम यांच्यासह अन्य युवक कार्यकर्ते तालुक्यात जोमाने काम करीत आहेत. तालुक्यातील अनेक युवकांना चांगल्या नवख्या नेतृत्वाची गरज होती. या तीन युवा नेतृत्वामुळे कवठेमहांकाळ तालुक्यातील युवक कार्यकर्त्यांना मोठे बळ निर्माण झाले आहे.
फोटो- प्रतीक पाटील, रोहित पाटील, शांतनू सगरे