जिल्ह्यात राष्ट्रवादी बळकट करणार : विराज नाईक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:19 IST2021-07-20T04:19:23+5:302021-07-20T04:19:23+5:30
कुरळप : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस संघटना बळकट ...

जिल्ह्यात राष्ट्रवादी बळकट करणार : विराज नाईक
कुरळप : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस संघटना बळकट करणार आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांनी केले.
ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) येथे दत्त उद्योग समुहाच्या विविध सहकारी संस्थांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. दत्त पतसंस्थेचे अध्यक्ष अशोकराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
विराज नाईक म्हणाले की, गावागावात राष्ट्रवादी काँग्रेसला संघटन करणे गरजेचे आहे. दत्त उद्योग समुहाचे संस्थापक रघुनाथ पाटील यांच्या प्रेरणेतून सहकार रूजला आहे. त्यांच्या जाण्याने सहकाराची पोकळी निर्माण झाली आहे.
यावेळी सोसायटीचे अध्यक्ष प्रकाश पाटील, सी. व्ही. पाटील, माजी सरपंच महेंद्र पाटील, रणजित पाटील, सरपंच जोत्स्ना पाटील आदी उपस्थित होते. उपसरपंच संभाजी पाटील यांनी आभार मानले.