राष्ट्रवादीमागे गुलामासारखे जाणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:19 IST2021-06-18T04:19:27+5:302021-06-18T04:19:27+5:30

कवठेमहांकाळ येथील काँग्रेस भवनमध्ये काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक पार पडली. यावेळी भोसले बोलत होते. ते म्हणाले ...

The NCP will not go after slaves | राष्ट्रवादीमागे गुलामासारखे जाणार नाही

राष्ट्रवादीमागे गुलामासारखे जाणार नाही

कवठेमहांकाळ येथील काँग्रेस भवनमध्ये काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक पार पडली. यावेळी भोसले बोलत होते.

ते म्हणाले की, काँग्रेस पक्ष देशातील सर्वात मोठा पक्ष आहे. कुणी आम्हाला कमी लेखण्याची चूक करू नये. येणाऱ्या सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी करेल. तालुक्यात राष्ट्रवादीमागे राजकीय गुलामासारखे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अजिबात जायचे नाही.

तालुक्यातील प्रत्येक गावात पक्ष मजबूत करण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत. आता लढून मरू, परंतु मुजरा घालणार नाही, असा इशारा कार्याध्यक्ष अविराजे शिंदे यांनी दिला.

ज्येष्ठ नेते बाळासाहेब गुरव म्हणाले की, तालुक्यातील युवा कार्यकर्त्यांना पक्षाकडे खेचण्यासाठी नूतन पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत.

यावेळी प्रा. दादासाहेब ढेरे, धनाजीराव पाटील, तालुकाध्यक्ष संजय हजारे, वैभव गुरव, प्रा. शशिकांत पवार, राजाराम घोरपडे, चैतन्य पाटील, मुबारक मुल्ला, संग्राम सोनवणे, अल्लाबक्ष मुल्ला, चंद्रकांत खरात, रमेश कोळेकर उपस्थित होते.

Web Title: The NCP will not go after slaves