शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जयंत पाटलांचे मौन अन् करेक्ट कार्यक्रम, मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीची पूर्वपरीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 14:07 IST

बहुतांशी ग्रामपंचायतींत राष्ट्रवादीतीलच गट एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत

अशोक पाटीलइस्लामपूर : वाळवा तालुका आणि शिराळा विधानसभा मतदार संघातील ४८ गावांतील ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे वर्चस्व आहे. यातील बहुतांशी ग्रामपंचायतींत राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत. त्यामुळेच जयंत पाटील थेट सक्रिय नाहीत. ही निवडणूक म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेची पूर्वपरीक्षाच म्हणावी लागेल.वाळवा तालुक्यात राष्ट्रवादीची सत्ता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकवटली आहे. याठिकाणी शहरभाग वगळता ग्रामीण भागात भाजप, काँग्रेस पक्षांची ताकद नगण्य आहे. राष्ट्रवादी विरोधात काही मोजकेच गट सक्रीय आहेत.बहुतांशी ग्रामपंचायतींत राष्ट्रवादीतीलच गट एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. त्यामुळेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील थेट प्रचारात नाहीत. परंतु ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतच काहींचा कार्यक्रम करण्याची खेळी मात्र पाटील यांनी आखली आहे. या निवडणुकीत दिग्गज नेते प्रचारातून सक्रिय दिसत नाहीत. यामध्ये प्रामुख्याने माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, आमदार मानसिंगराव नाईक, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी आपल्या भूमिका गूलदस्त्यात ठेवल्या आहेत.ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांची फौज सक्रिय आहे. बहुतांशी ग्रामपंचायतींवर सर्वच पक्ष एकमेकांच्या सोयीने आघाडी करून लढत आहेत. तर काही गावांत भाऊबंदकीमध्येच लढती दिसत आहेत. सदस्यापेक्षा आता थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत रंगत आली आहे. त्यामुळेच सरपंचपदासाठी घोडेबाजार मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :Sangliसांगलीgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकJayant Patilजयंत पाटील