शिराळ्यात दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीची सत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:27 IST2021-01-19T04:27:56+5:302021-01-19T04:27:56+5:30
शिराळा : तालुक्यातील दोन ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार मानसिंगराव नाईक गटाने एकतर्फी विजय मिळविला. बिळाशी येथे सत्यजित देशमुख गटाबरोबर आमदार ...

शिराळ्यात दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीची सत्ता
शिराळा : तालुक्यातील दोन ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार मानसिंगराव नाईक गटाने एकतर्फी विजय मिळविला. बिळाशी येथे सत्यजित देशमुख गटाबरोबर आमदार नाईक यांनी युती केली होती. जांभळेवाडी येथे सत्तांतर झाले आहे. बिळाशी येथे या अगोदरच्या दोन निवडणुका बिनविरोध झाल्या होत्या; मात्र यावेळी भाजपला एकही जागा मिळाली नाही.
बिळाशी आणि जांभळेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी प्रणीत आघाडीने बाजी मारली. बिळाशी ग्रामपंचायत निवडणुकीत मानसिंगराव नाईक आणि सत्यजित देशमुख प्रणीत भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलने ११ विरुद्ध शून्य असे बहुमत घेतले.
जांभळेवाडीमध्ये मानसिंगराव नाईक यांच्या नेतृत्वाखालील जय हनुमान ग्रामविकास पॅनेलने सहा विरुद्ध एक असे बहुमत घेतले. त्यामुळे तालुक्यातील दोन्ही ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. बिळाशीमध्ये विकास पांढरे, विजय रोकडे, सुवर्णा पाटील, विनायक पाटील, सुजाता देशमाने, सरिता पाटील, दत्तात्रय मगदूम, कल्पना यमगर, चंद्रकांत साळुंखे, इंदुताई यमगर, सुवर्ण साळुंखे, आदी विजयी झाले.
जांभळेवाडी ग्रामपंचायतीत दादासाहेब मांगलेकर, रेश्मा मरळे, शारदा जाधव, सयाजीराव देवकर, वैशाली साळुंखे, सचिन मरळे, स्वाती कडवेकर हे विजयी झाले.
चाैकट
दोन मतात पराभव
जांभळेवाडी ग्रामपंचायतींमध्ये २० जणांनी नोटाचा पर्याय निवडला. प्रभाग क्रमांक एकमध्ये फक्त दोन मताने एका उमेदवाराचा पराभव झाला आहे, तर याच प्रभागात सात मते नोटाला आहेत.
फोटो-१८शिराळा१ व २
फोटो ओळ : बिळाशी (ता. शिराळा) येथे ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर आमदार मानसिंगराव नाईक यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.