शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याची ४५ लाखांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 21:03 IST

मिरजेतील एकावर गुन्हा : रक्कम दामदुपटीचे आमिष दाखवले

लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली : प्रत्येक महिन्याला दहा टक्के परतावा देतो, तसेच गुंतवणुकीची रक्कम दामदुप्पट करण्याचे आमिष दाखवत जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी ताजुद्दीन गुलाब तांबोळी (वय ४८, रा. सावळज, ता. तासगाव) यांची ४६ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मौलासाब हसनसाब कोलार (रा. मिरज) याच्याविरुद्ध संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी, ताजुद्दीन तांबोळी हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा सावळज येथे हॉटेल व्यवसाय आहे. तांबोळी हे काही वर्षांपासून सांगलीत पंचशीलनगर येथे राहतात. चार वर्षांपूर्वी संशयित मौलासाब कोलार याची तांबोळी यांच्याशी ओळख झाली. तेव्हा कोलार याने त्यांचा विश्वास संपादन केला. कमी कालावधीत पैसे दामदुप्पट करून देण्याचे आमिष दाखविले. तसेच दर महिन्याला गुंतवणुकीच्या रकमेवर दहा टक्के परतावा देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे तांबोळी यांनी कोलार याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून ४५ लाख ८७ हजार रुपयांची गुंतवणूक त्याच्याकडे केली. जून २०२१ ते डिसेंबर २०२१ या कालावधीत पंचशीलनगर येथे हा व्यवहार झाला होता.

गुंतवणुकीनंतर पहिले दोन-तीन महिने संशयित कोलार याने तांबोळी यांना परतावा दिला. परंतु त्यानंतर मात्र त्याने परतावा देण्यास टाळाटाळ सुरू केली. तांबोळी यांनी गुंतवणुकीच्या रकमेबाबत वारंवार पाठपुरावा केला. तेव्हा कोलार याने उडवाउडवीची उत्तरे दिली. गेली तीन-चार वर्षे पाठपुरावा केल्यानंतर तांबोळी यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी संजयनगर पोलिस ठाण्यात संशयित कोलार याच्याविरोधात दि. २१ रोजी तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी कोलार याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. त्याचा शोध सुरू केला आहे.

कोलारविरुद्ध विश्रामबागला गुन्हा

पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून कोलार याने ७५ लाख रुपयांची फसवणूक केल्याबद्दल राजन विजय चव्हाण (रा. गव्हर्मेंट कॉलनी) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात २०२२ मध्ये फिर्याद दिली आहे. संशयित कोलार हा मूळचा कर्नाटकचा आहे.

दामदुपटीच्या आमिषाने अनेकांची फसवणूक

कोलार याने मिरजेत एका इमारतीमध्ये ऑफिस सुरू केले होते. दामदुपटीचे आमिष दाखवून त्याने अनेकांना गुंतवणूक करण्यास सांगितले. सुरुवातीला परतावा देऊन तो विश्वास संपादन करत होता. त्यानंतर पैसे मागताच उडवाउडवीची उत्तरे देऊन त्याने अनेकांची फसवणूक केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी