विधानसभेला आटपाडीत राष्ट्रवादीचा आमदार व्हावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:19 IST2021-06-11T04:19:32+5:302021-06-11T04:19:32+5:30
आटपाडी तालुक्याचा अन्याय नष्ट करण्यासाठी येत्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा तालुक्याचा आमदार व्हावा, असे आवाहन ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील यांनी ...

विधानसभेला आटपाडीत राष्ट्रवादीचा आमदार व्हावा
आटपाडी तालुक्याचा अन्याय नष्ट करण्यासाठी येत्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा तालुक्याचा आमदार व्हावा, असे आवाहन ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील यांनी केले.
आटपाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पक्ष स्थापनेचा इतिहास, महाराष्ट्रद्वेष्टे राजकारण, शरद पवार यांचे जनाधार असलेले नेतृत्व, जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाढीस लागलेला पक्ष, दुष्काळग्रस्तांना पाणी मिळावे म्हणून सर्वप्रथम राजारामबापूंनी दिलेला खुजगावचा लढा यावरही रावसाहेब पाटील यांनी भाष्य केले.
यावेळी आनंदराव पाटील, सादिक खाटीक, एन.पी. खरजे, अनिता पाटील, अश्विनी कासार यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी सभापती विजयसिंह पाटील, कल्लाप्पा कुटे, संभाजीराव पाटील, दत्ताभाऊ यमगर, शशिकांत भोसले, मनोज भोसले, सुजाता टिंगरे, सुरज पाटील, जालिंदर कटरे, संभाजीराव पाटील, समाधान भोसले आदी उपस्थित होते. विजय पुजारी यांनी आभार मानले.