राष्ट्रवादीने नेहमीच महिलांना सन्मानाची वागणूक दिली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:30 IST2021-09-12T04:30:24+5:302021-09-12T04:30:24+5:30

पेठ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महिलांना पहिल्यापासून सन्मानाची वागणूक दिली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मला संधी दिली. ...

The NCP has always treated women with respect | राष्ट्रवादीने नेहमीच महिलांना सन्मानाची वागणूक दिली

राष्ट्रवादीने नेहमीच महिलांना सन्मानाची वागणूक दिली

पेठ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महिलांना पहिल्यापासून सन्मानाची वागणूक दिली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मला संधी दिली. त्याचे सोने करण्याचा प्रयत्न मी करीन, असे प्रतिपादन वाळवा तालुका महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनिता देशमाने यांनी केले.

पेठ (ता. वाळवा) येथे अतुल पाटील मित्र परिवारातर्फे विघ्नहर्ता पतसंस्थेचे संस्थापक अतुल पाटील व हणमंतराव कदम यांच्या हस्ते देशमाने यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्या बाेलत हाेत्या. यावेळी पैलवान जयंत पाटील, बंडा कदम, किर्तीकुमार देशमाने, विजयकुमार पाटील, रवींद्र माने, सुनील सपकाळ, तुळसीदास पिसे, प्रकाश पाटणेकर, प्रताप पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो : ११ पेठ १

ओळी : पेठ (ता. वाळवा) येथे अतुल पाटील मित्र परिवारातर्फे तालुका राष्ट्रवादीच्या नूतन अध्यक्षा सुनिता देशमाने यांचा सत्कार युवा नेते अतुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी हणमंतराव कदम, जयंत पाटील, बंडा कदम उपस्थित हाेते.

Web Title: The NCP has always treated women with respect