खानापूर घाटमाथ्यावर राष्ट्रवादीचे वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:28 IST2021-01-19T04:28:09+5:302021-01-19T04:28:09+5:30
पोसेवाडी आणि शेडगेवाडी ग्रामपंचायती जिंकत राष्ट्रवादीने सत्तांतर घडवून आणले आहे. मेंगाणवाडी ग्रामपंचायतीत दोन गटात झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या एका गटाचा ...

खानापूर घाटमाथ्यावर राष्ट्रवादीचे वर्चस्व
पोसेवाडी आणि शेडगेवाडी ग्रामपंचायती जिंकत राष्ट्रवादीने सत्तांतर घडवून आणले आहे. मेंगाणवाडी ग्रामपंचायतीत दोन गटात झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या एका गटाचा पराभव झाला आहे, तर निवडून आलेल्या गटात शिवसेनेच्या काही उमेदवारांबरोबर राष्ट्रवादीचेही उमेदवार विजयी झाले आहेत. यामुळे या ठिकाणी शिवसेनेबरोबर राष्ट्रवादीचा गटही ग्रामपंचायत ताब्यात आल्याचा दावा करीत आहे.
भडकेवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. ही ग्रामपंचायत माजी जि. प. सदस्य सुहास शिंदे गटाने ताब्यात घेतली आहे.
खानापूर घाटमाथ्यावर राष्ट्रवादी काँग्रेस नव्याने वर्चस्व निर्माण करू लागली आहे. पालकमंत्री जयंत पाटील, माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली तालुका उपाध्यक्ष सचिन शिंदे यांनी पक्षवाढीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
निवडून आलेल्या विजयी उमेदवारांचा सत्कार सचिन शिंदे यांच्याहस्ते खानापूर राष्ट्रवादी कार्यालयात करण्यात आला.