राष्ट्रवादीत सर्वसामान्यांना न्याय मिळतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:25 IST2021-09-13T04:25:29+5:302021-09-13T04:25:29+5:30

कुंडल : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवार यांच्या विचारांचा पक्ष आहे. इथे सर्वसामान्यांना न्याय मिळतो. राष्ट्रवादीचे भविष्य उज्ज्वल ...

In the NCP, the common man gets justice | राष्ट्रवादीत सर्वसामान्यांना न्याय मिळतो

राष्ट्रवादीत सर्वसामान्यांना न्याय मिळतो

कुंडल : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवार यांच्या विचारांचा पक्ष आहे. इथे सर्वसामान्यांना न्याय मिळतो. राष्ट्रवादीचे भविष्य उज्ज्वल आहे. आज आमच्यावर विश्वास ठेवून तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. याची जणीव ठेवत तुमच्या विश्वासाला तडा जाणार नाही याची खात्री देतो अशी ग्वाही आमदार अरुण लाड यांनी दिली.

वडियेरायबाग (ता. कडेगाव) येथील कार्यकर्त्यांनी कुंडल येथे राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी ते बोलत होते. अरुण लाड यांनी सर्वांचे स्वागत केले.

आमदार लाड म्हणाले की, जमीन वाढणार नाही, पण आपण त्याच जमिनीवर भरघोस उत्पादन घेऊन नफा वाढवू शकतो. क्रांती साखरच्या कारखान्यामार्फत आपले उसाचे उत्पादन वाढावे, यासाठी प्रयत्नशील राहू असेही त्यांनी सांगितले.

हा पक्षप्रवेश नाही तर घरवापसी असल्याचे मत रामचंद्र वाघमोडे यांनी व्यक्त केले. लक्ष्मण वाघमोडे, उत्तम वाघमोडे, संपत वाघमोडे, विशाल वाघमोडे, संतोष वाघमोडे, सुभाष वाघमोडे, रामचंद्र वाघमोडे, श्रीरंग वाघमोडे, धनाजी वाघमोडे, येतगांवचे जितेंद्र कदम यांनी पक्षप्रवेश केला.

या वेळी सुरेश शिंगटे, रमेश एडके, वैभव पवार, विनायक महाडीक, पूजा लाड, रमेश कदम, विराज पवार, संभाजी पाटील आदी उपस्थित होते.

120921\img-20210912-wa0028.jpg

राष्ट्रवादी प्रवेश

Web Title: In the NCP, the common man gets justice