कामेरीत ‘सहकार’साठी राष्ट्रवादी-भाजपा सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:19 IST2021-06-25T04:19:32+5:302021-06-25T04:19:32+5:30

फोटो ओळी : कामेरी (ता. वाळवा) येथे सहकार पॅनलचे उमेदवार संजय पाटील यांच्या प्रचारार्थ जयराज पाटील, शहाजी पाटील, सुनील ...

NCP-BJP active for 'co-operation' in Kameri | कामेरीत ‘सहकार’साठी राष्ट्रवादी-भाजपा सक्रिय

कामेरीत ‘सहकार’साठी राष्ट्रवादी-भाजपा सक्रिय

फोटो ओळी : कामेरी (ता. वाळवा) येथे सहकार पॅनलचे उमेदवार संजय पाटील यांच्या प्रचारार्थ जयराज पाटील, शहाजी पाटील, सुनील पाटील, संग्राम पाटील, एम. के. जाधव, दिलीप जाधव, बंडाकाका पाटील आदी सहभागी झाले होते.

कामेरी : कामेरी ( ता. वाळवा) येथे कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीसाठी सहकार पॅनेलच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी-भाजपाचे नेते व कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. पॅनेलचे उमेदवार संजय पाटील यांच्या प्रचारार्थ घरोघरी फिरून विजयासाठी सभासदांना आवाहन करत आहेत.

राष्ट्रवादीचे इस्लामपूर शहर अध्यक्ष व नगरसेवक शहाजी पाटील, कामेरीचे ज्येष्ठ नेते सुनील पाटील, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव जयराज पाटील, युवा नेते संग्राम जगदीश पाटील, छगन पाटील, बंडाकाका पाटील, उद्योजक एम. के. जाधव, शहाजी पाटील, योगेश पाटील, संग्राम पाटील आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: NCP-BJP active for 'co-operation' in Kameri