एनसीसीमुळे विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास : मिलिंद हुजरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:49 IST2021-02-06T04:49:13+5:302021-02-06T04:49:13+5:30

पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालय तासगाव येथे एनसीसी विभाग आणि १६ महाराष्ट्र बटालियन एनसीसी सांगली यांच्यातर्फे आयोजित शिबिराच्या समारोपप्रसंगी ...

NCC helps students develop personality: Milind Hujre | एनसीसीमुळे विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास : मिलिंद हुजरे

एनसीसीमुळे विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास : मिलिंद हुजरे

पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालय तासगाव येथे एनसीसी विभाग आणि १६ महाराष्ट्र बटालियन एनसीसी सांगली यांच्यातर्फे आयोजित शिबिराच्या समारोपप्रसंगी डॉ. हुजरे म्हणाले. या शिबिरात मुलांना शस्त्र प्रशिक्षण, मॅप रीडिंग, मिलिटरी इतिहास, नेतृत्वगुण विकास, एकता आणि अनुशासन यासंबंधी मार्गदर्शन करण्यात आले. शिबिरास १६ महाराष्ट्र बटालियन एनसीसीचे कमांडिंग ऑफिसर कर्नल एस. के. बाबू, सुभेदार मेजर मोहन सूर्यवंशी यांनी भेट दिली. लेफ्टनंट डॉ. विनोदकुमार कुंभार, लेफ्टनंट प्रा. किशोर पाटील, सुभेदार इमामसाब तोरगल, हवालदार बाबूराव पवार, हवालदार संतोष यादव यांनी शिबिराचे संयोजन केले. या शिबिरात ७० विद्यार्थी सहभागी झाले हाेते. लेफ्टनंट डॉ. विनोदकुमार कुंभार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. लेफ्टनंट किशोर पाटील यांनी आभार मानले. आदिती गुरव आणि सोनाली कणसे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला प्रा. आण्णासाहेब बागल, अधीक्षक एम. बी. कदम. अकौंटंट एम. के. पाटील यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक विद्यार्थी उपस्थित होते.

फाेटाे : ०५ तासगाव १

Web Title: NCC helps students develop personality: Milind Hujre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.