सायकल दिनानिमित्त मिरजेत निसर्गप्रेमीची फेरी
By Admin | Updated: January 2, 2015 00:07 IST2015-01-01T23:06:35+5:302015-01-02T00:07:17+5:30
निसर्ग संवाद संस्थेतर्फे काढलेल्या निसर्ग सायकल क्लबच्या सायकल फेरीस नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.

सायकल दिनानिमित्त मिरजेत निसर्गप्रेमीची फेरी
मिरज : नववर्ष व सायकल दिनानिमित्त मिरजेत सायकल फेरी काढण्यात आली. पर्यावरण संवर्धन व सार्वजनिक आरोग्य याविषयी जागृतीसाठी निसर्ग संवाद संस्थेतर्फे काढलेल्या निसर्ग सायकल क्लबच्या सायकल फेरीस नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.
आरोग्य संवर्धन आर्थिक बचत, शहराच्या स्वच्छतेसाठी धूळ, धूर, गोंगाट, पार्किंग समस्या टाळणे, देशाचा आर्थिक विकास व पर्यावरण संतुलनासाठी सायकल चालविण्याचा संदेश देण्यात आला. निसर्ग सायकल क्लबचे विलास शेटे, राजेंद्र जोशी, राहुल खरे, रामलिंग तोडकर, अशोक तुळपुळे, राजा देसाई, आप्पासाहेब कुंभार, किरण देशपांडे, संजय कट्टी, बाळासाहेब गुजर यांच्यासह विद्यार्थी सायकल फेरीत सहभागी होते. गणेश तलाव येथून फेरीला सुरूवात झाली. मेडिकल, कॉलेज, गांधी पुतळा, गुरूवार पेठ मार्गे लक्ष्मी मार्केट येथे सांगता झाली. विद्यामंदिर प्रशालेतील विद्यार्थी कुमार लामदाडे, आशिष पाटील व सुरेश आवटी (वय ११) या सर्वात लहान सायकलपटूंसह १४ जणांनी सायकलने व १० जणांनी धावत कोल्हापुरातून मिरजेपर्यंत ज्ञानज्योती आणल्याबद्दल सायकलपटू अशोक पाटील, डॉ. मुकुंद पाठक, दादासाहेब सावंत यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. (वार्ताहर)