शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील
2
मनोज जरांगे पाटील आता तरी मुंबई गाठणार की वेशीवरुनच ऐनवेळी माघारी फिरणार?; चर्चांना उधाण
3
Stock Markets Today: आठवड्याच्या अखेरच्या दिवशी शेअर बाजारात घसरण; निफ्टी २५,००० च्या खाली, Wipro, Tata Motors, BEL मध्ये तेजी
4
दक्षिण अमेरिकेत मोठा भूकंप; हादऱ्यांमुळे लोक घाबरले, ७.५ तीव्रता, त्सुनामीचा इशारा
5
लखपती बनण्याची मशीन आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ २२२ रुपयांत सुरू करा गुंतवणूक, पाहा कॅलक्युलेशन
6
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
7
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
8
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
9
लक्ष्याच्या लेकीचं व्यवसायात पाऊल! स्वानंदी बेर्डेने सुरू केलं 'कांतप्रिया', आई-वडिलांच्या नावावरुन ठेवलं ब्रँडचं नाव
10
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
11
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
12
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
13
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
14
'दूरस्थ'चे दोन महिन्यांत केवळ १०,१६९ प्रवेश; कोणत्या अभ्यासक्रमांना किती प्रवेश? जाणून घ्या
15
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
16
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
17
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
18
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
19
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
20
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे

इस्लामपूर बस स्थानकात राष्ट्रवादी कार्यकर्त्याचा उद्दामपणा; फलाटावरच लावली चारचाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 20:37 IST

इस्लामपूर येथील बस स्थानकावर सोमवारी सकाळी राष्ट्रवादीच्या एका युवा कार्यकर्त्याने उद्दामपणाचा कळसच गाठला. ज्या ठिकाणी बसची ये-जा सुरु असते, तेथेच आपली चारचाकी गाडी लावून तो एका महिलेला बसमध्ये बसविण्यासाठी गेला होता.

ठळक मुद्देइस्लामपूर बस स्थानकात राष्ट्रवादी कार्यकर्त्याचा उद्दामपणाएसटी फलाटावरच लावली स्वत:ची चारचाकी

इस्लामपूर : येथील बस स्थानकावर सोमवारी सकाळी राष्ट्रवादीच्या एका युवा कार्यकर्त्याने उद्दामपणाचा कळसच गाठला. ज्या ठिकाणी बसची ये-जा सुरु असते, तेथेच आपली चारचाकी गाडी लावून तो एका महिलेला बसमध्ये बसविण्यासाठी गेला होता. गाडी बाजूला काढण्याबाबत एसटी चालक, वाहकांनी विनंती केली. परंतु कोणाचाही मुलाहिजा त्या युवकाने ठेवला नाही.सकाळी ९.१५ च्या सुमारास सर्वच फलाटांवर कोल्हापूर, सांगली, तासगाव, विटा, कऱ्हाडकडे जाणाऱ्या बसेस लागल्या होत्या. दिवाळीची सुटी संपल्याने माघारी जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठी गर्दी बस स्थानकात होती. अशा गर्दीच्या ठिकाणीच राष्ट्रवादीच्या एका युवा कार्यकर्त्याने आपली चारचाकी गाडी (क्र. एमएच १२-एच. एल.-0८१७) कोल्हापूर बसेसच्या फलाटावर लावली.

याठिकाणी गाडी लावण्यास परवानगी नसतानाही, संबंधित युवकाने हा उद्दामपणा केला. त्यावर येथील वाहतून नियंत्रक दीपक यादव यांनी, येथून गाडी काढा व पार्किंगची व्यवस्था केली आहे, तेथे लावा, अशी विनंती त्याला केली. यावर त्याने यादव यांच्यासोबत वाद घातला. त्यानंतर त्याने आपली गाडी ताकारी, ऐतवडे खुर्द, वारणानगर भागाकडे जाणाऱ्या बसेस जेथे लागतात, तेथे लावली.

काही वेळाने सांगलीकडे जाणारी बस फलाटावर लागताच, त्याने त्याची गाडी बरोबर बसच्या मागील बाजूस लावली. फलाटावरुन बस मागे घेताना या गाडीचा अडथळा येत होता. त्यामुळे पुन्हा संबंधित युवकास वाहकाने, गाडी बाजूला घ्या, अशी विनंती केली.यावेळी मात्र हा युवकाने कहरच केला.  त्याने वाहकालाच दमबाजी केली. माझ्या गाडीवर बस घाल. तुझ्याकडून डबल पैसे वसूल करण्याची धमक माझ्यात आहे, असा दम दिला. शेवटी स्वत:च्या गाडीतील महिलेला बसमध्ये बसवूनच या उद्दाम युवकाने आपली गाडी बाजूला काढून निघून गेला. तेथे उपस्थित असलेले सर्वच प्रवासी हा प्रकार पाहतच राहिले.ही चारचाकी (क्र. एमएच १२-एच. एल.-०८१७) अचानक बसस्थानक आवारात आली. त्याने कोल्हापूरच्या बस लागतात त्या फलाटावरच आपली गाडी उभी केली होती. त्याला गाडी काढण्यासाठी विनंती केली, तरीसुध्दा त्याने उद्दापणाचा कळस गाठला. यानंतरही त्याने पुन्हा बसच्या मागील बाजूस आपली गाडी उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण केला.दीपक यादव, वाहतूक नियंत्रक, इस्लामपूर आगार.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळSangliसांगलीNCPराष्ट्रवादी काँग्रेस