शहरं
Join us  
Trending Stories
1
नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर, सोमय्यांच्या पुत्राला भाजपकडून उमेदवारी; वॉर्डही ठरले, एबी फॉर्मचे वाटप सुरू
2
बांगलादेशात आंदोलकांना मोठा धक्का! सेव्हन सिस्टर्सच्या मास्टरमाईंडनेच साथ सोडली, विद्यार्थी नेते सत्तेसाठी हपापले...
3
तुम्ही तुमचा स्मार्टफोन कसा ठेवता? उलटा की सुलटा... ९९ टक्के भारतीय अनभिज्ञ...
4
हात-पाय बांधले, हत्या केली अन् चेहरा जाळला; नोएडातील डंपिंग ग्राऊंडवर तरुणीचा छिन्नविच्छिन्न देह सापडला!
5
मुस्लिम कार्यकर्त्याचं स्वागत करणं ब्रिटीश पंतप्रधानांना पडलं महागात; कीर स्टार्मर यांच्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड!
6
काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, पण वर्षा गायकवाड कुठे दिसल्या नाहीत; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
‘वंचित’ला ठाकरेंची साथ, भाजपा वगळून शिंदे-अजितदादा एकत्र; राज्यात युती, आघाडीचे काय चित्र?
8
‘ते मरावेत’, असं झेलेन्स्की यांना का वाटतं?
9
भीषण काळरात्र! टाटा नगर-एर्नाकुलम एक्स्प्रेसमध्ये आग; एकाचा होरपळून मृत्यू, दोन डबे खाक!
10
खिशाला लागणार कात्री! नवीन वर्ष २०२६ मध्ये चांदी ₹३ लाख आणि सोनं ₹१.६० लाखांच्या पार जाणार?
11
आजचा दिवस रेल्वे अपघातांचा! जेव्हा टाटानगर एक्स्प्रेस जळत होती, तेव्हा जगाच्या या कोपऱ्यात ट्रेन घसरली, १३ जणांचा मृत्यू
12
'ऑपरेशन सिंदूर' वेळी भारताला समजावण्यासाठी हे दोन देश आले होते, युद्धविरामवर पाकिस्तानचा दावा
13
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी; DCM एकनाथ शिंदेंनी दिले आदेश
14
भारतासाठी इशाऱ्याची घंटा; बांगलादेश हा केवळ शेजारी देश नाही, तर... 
15
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२१,३४१ चं फिक्स व्याज, गॅरंटीसह मिळणार परतावा
16
Video : हवेत टक्कर अन् काही सेकंदात जमिनीवर कोसळले हेलिकॉप्टर! अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद
17
१ महिन्यात ३ चतुर्थींचा अद्भूत योग; २०२६ मध्ये किती अन् कधी विनायक-संकष्टी तिथी? यादीच पाहा
18
चांदी जैसा रंग है तेरा...! 'ही' छैल छबेली चांदी फक्त भाव खात चालली आहे...
19
"युक्रेन शांतता चर्चा ९५% यशस्वी, पण..." झेलेन्स्की-ट्रम्प यांच्यात काय चर्चा झाली? हा महत्वाचा मुद्दा अद्यापही लटकूनच
20
आजचे राशीभविष्य २९ डिसेंबर २०२५ : या राशीला आज लॉटरी लागणार, शेअर्समध्ये पण...
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरनंतर सांगलीतही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार, चर्चांना मिळाला पूर्णविराम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 18:12 IST

Local Body Election: गेले तीन-चार दिवस आघाड्या होण्यासंदर्भात बैठका निष्फळ ठरत होत्या

जत : जत नगरपरिषद निवडणुकीसाठी गेले तीन-चार दिवस आघाड्या होण्यासंदर्भात बैठका होत होत्या. पुन्हा बैठका निष्फळ ठरत होत्या. अखेर दोन राष्ट्रवादीची व बहुजन समाज पक्ष अशा तिघांची मिळून आघाडी झाल्याची माहिती राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते विलासराव जगताप व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते सुरेश शिंदे यांनी आघाडी केल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.विलासराव जगताप म्हणाले, बुधवारी सायंकाळी दोन्ही गटात चर्चा होऊन आघाडी करण्याचे ठरविले असून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी सुरेश शिंदे यांचे नाव निश्चित केले. दोन जागा बहुजन समाज पक्षाला देण्याचे ठरले असून बसपा पक्षाचे दोन उमेदवार त्यांच्या हत्ती या चिन्हावर लढवतील, इतर २३पैकी २१ उमेदवार घड्याळ या चिन्हावर उमेदवार निवडणूक लढवतील, असे जगताप यांनी जाहीर केले. 

वाचा : भाजप बोलेना म्हणूनच शरद पवार पक्षाशी आघाडी - हसन मुश्रीफसुरेश शिंदे म्हणाले, दोन राष्ट्रवादीत आघाडी निश्चित ठरली असून आम्ही दोघेही एकदिलाने प्रचार यंत्रणा राबवून सर्वच्या सर्व जागा जिंकण्याच्या दृष्टीने ताकद लावू. यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष मन्सूर खतीब, अप्पा पवार, प्रमोद सावंत, संग्राम जगताप, मच्छिंद्र वाघमोडे, इम्रान गवडी, शिशिकांत काळगी, शरणाप्पा अक्की, स्वप्नील शिंदे, दीपक पाटणकर, प्रकाश देवकुळे, अभिजित कणसे, नसीर मुल्ला, मकसूद नगरजी, अनाप्पा माळी, तानाजी व्हनखंडे, सचिन मदने उपस्थित होते.चर्चांना पूर्णविराम सांगली जिल्ह्यात प्रथमच जत येथे दोन राष्ट्रवादी गटाची आघाडी झाली आहे. गेले चार - पाच दिवस आघाडीबाबत सारख्या वावड्या उठत होत्या. अखेर दोन्ही राष्ट्रवादीचे आघाडीबाबत ठरल्याने चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.