साळुंखे महाविद्यालयात बौद्धिक संपदा अधिकार राष्ट्रीय वेबिनार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:24 IST2021-02-07T04:24:05+5:302021-02-07T04:24:05+5:30
मिरज : मिरजेतील डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालयात ‘बौद्धिक संपदा अधिकार’ या विषयावर राष्ट्रीय वेबिनार पार पडले. यावेळी संसाधन व्यक्ती ...

साळुंखे महाविद्यालयात बौद्धिक संपदा अधिकार राष्ट्रीय वेबिनार
मिरज : मिरजेतील डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालयात ‘बौद्धिक संपदा अधिकार’ या विषयावर राष्ट्रीय वेबिनार पार पडले. यावेळी संसाधन व्यक्ती शिवाजी विद्यापीठाचे अर्थशास्त्र विभागातील प्रा. पी. एस. कांबळे म्हणाले, बौद्धिक संपदा अधिकाराबाबत प्राध्यापक, विद्यार्थी, संशोधक यांच्यात जागृतीची आवश्यकता आहे. बौद्धिक संपदा अधिकारात पेटंट्स, ट्रेड मेकर्स, कॉपी राईट्स, जियोग्राफिकल इंडिकेशन्स, ट्रेड सिक्रेटस् या अधिकारांचा समावेश होतो. उत्पादनकर्त्याच्या मूळ उत्पादनाची मालकी प्रस्थापित करण्यासंबंधी कायदेशीररित्या केलेली तरतूद म्हणजे बौद्धिक संपदा अधिकार कायदा होय. बौद्धिक संपदा अधिकारात भारतातील संशोधकांनी मिळवलेल्या पेटंट्सची आकडेवारी त्यांनी दिली. पेटंट्स मिळविण्यासाठी शासकीय स्तरावर मार्गदर्शन व अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष शेळके म्हणाले, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेने या विषयाचे महत्त्व ओळखून २५ लाख रुपयांच्या स्वनिधीतून ‘अभय रिसर्च सेंटर’ची निर्मिती केली असून, या संशोधन केंद्राच्या माध्यमातून भविष्यात अनेक पेटंट्स मिळविण्यासाठी मार्गदर्शन केले जाईल. प्रा. विश्वास सूर्यवंशी यांनी स्वागत केले तर प्रा. अमोल जरग यांनी सूत्रसंचालन केले. या वेबिनारमध्ये ११० प्राध्यापक, संशोधक सहभागी झाले होते. हिंदी विभाग व भूगोल शास्त्र विभागातर्फे वेबिनारचे संयोजन करण्यात आले होते. प्रा. वाय. एस. गायकवाड यांनी आभार मानले.