जिल्हा पाणी तपासणी प्रयोगशाळेला राष्ट्रीय मानांकन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:29 IST2021-08-22T04:29:58+5:302021-08-22T04:29:58+5:30
सांगली : भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा कार्यालयाकडील पाच प्रयोगशाळांपैकी जिल्हास्तरावर कार्यरत असलेल्या सांगलीच्या जिल्हा पाणी तपासणी प्रयोगशाळेला राष्ट्रीय ...

जिल्हा पाणी तपासणी प्रयोगशाळेला राष्ट्रीय मानांकन
सांगली : भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा कार्यालयाकडील पाच प्रयोगशाळांपैकी जिल्हास्तरावर कार्यरत असलेल्या सांगलीच्या जिल्हा पाणी तपासणी प्रयोगशाळेला राष्ट्रीय अधिस्वीकृतीकरण मानांकन मिळाले आहे, अशी माहिती वरिष्ठ भूवैज्ञानिक ऋषीराज गोसकी यांनी दिली आहे.
गोसकी म्हणाले की, जिल्हास्तरीय प्रयोगशाळा व भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा या कार्यालयाच्या अतंर्गत असणाऱ्या आटपाडी, जत, कवठेमहांकाळ व इस्लामपूर येथील प्रयोगशाळांमध्ये शासकीय संस्था, महानगरपालिका, निमशासकीय संस्था व स्वंयसेवी संस्था यांच्या स्तरावरून खासगी नमुने पाण्याची गुणवत्ता तपासणीची सोय उपलब्ध आहे. चांगली कामगिरी केल्याबद्दल सांगलीच्या जिल्हा पाणी तपासणी प्रयोगशाळाला राष्ट्रीय अधिस्वीकृतीकरण अंतर्गत अंतिम तपासणी दि. १९ मे २०२१ रोजी झाली होती. जिल्हा पाणी तपासणी प्रयोगशाळेस राष्ट्रीय अधिस्वीकृतीकरण मानांकन मिळाले आहे. मानांकन मिळविण्यासाठी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा संचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, राज्यस्तरीय वरिष्ठ रसायनी धोंडीराम वारे, प्रादेशिक उपसंचालक डॉ. मिलिंद देशपांडे यांचे मार्गदर्शन लाभले. जिल्ह्यातील प्रयोगशाळेतील कनिष्ठ भूवैज्ञानिक जयंत मिसाळ, प्रमोद भोसले, विद्या गडदे, अश्विनी पाटील, प्रयोगशाळेतील सर्व कर्मचारी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली आहे.