राष्ट्रीय नेमबाज खेळाडूकडून मिरजेत गरिबांना अन्नदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:20 IST2021-05-28T04:20:23+5:302021-05-28T04:20:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मिरज : राष्ट्रीय नेमबाज खेळाडू व वेबसिरीज निर्मात्या प्रियांका संगीता कमल या कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर ...

राष्ट्रीय नेमबाज खेळाडूकडून मिरजेत गरिबांना अन्नदान
लोकमत न्यूज नेटवर्क
मिरज : राष्ट्रीय नेमबाज खेळाडू व वेबसिरीज निर्मात्या प्रियांका संगीता कमल या कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर मिरजेत गरिबांना अन्नदानाचे काम करीत आहेत.
मिरजेतील प्रियांका या सध्या पुणे येथे वास्तव्यास आहेत. कोरोना साथीदरम्यान लाॅकडाऊनमध्ये गरिबांना जगण्यासाठी प्रत्येक दिवशी करावा लागणारा संघर्ष व त्यांचे होणारे हाल पाहून प्रियांका या गरिबांना मदत करण्यासाठी दोन आठवड्यांपूर्वी मिरजेत आल्या आहेत. प्रियांका यांनी त्यांच्या आजी श्रीमती कमल पांडुरंग यादव यांच्या पुण्यतिथीनिमित्त मिरजेत मोफत अन्नछत्र सुरू केले आहे. सिव्हिलमधील रुग्णांचे नातेवाईक व शहरात बसस्थानक रेल्वेस्थानकास विविध ठिकाणी गरीब बेघरांना त्या दररोज तयार अन्नाची पाकिटे वाटप करीत आहेत. प्रियांका या गेले आठवडाभर दररोज स्वखर्चाने सुमारे दीडशे अन्नाची पाकिटे तयार करून मोटारीतून वाटप करीत आहेत. आणखी काही दिवस अन्न वाटप व नंतर गरिबांना धान्य वाटप करणार असल्याचे प्रियांका यांनी सांगितले. गरिबांना मदत केल्याने आजीच्या आत्म्याला शांती मिळावी. प्रत्येक वृध्द माणसात मला माझी आजी दिसते. प्रत्येक तरुणात माझ्या वाईट दिवसात माझ्या पोटाला लागलेले चटके आठवतात. त्यामुळे दोन घास कोणाच्या मुखात पडले, तरी माझं जगणं सत्कर्मी लागल्याचे समाधान मिळत असल्याचेही प्रियांका यांनी सांगितले.