शिराळा येथे १० एप्रिल रोजी राष्ट्रीय लोकअदालत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:49 IST2021-03-13T04:49:21+5:302021-03-13T04:49:21+5:30
शिराळा : राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने मिटवावीत, असे आवाहन तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश ...

शिराळा येथे १० एप्रिल रोजी राष्ट्रीय लोकअदालत
शिराळा :
राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने मिटवावीत, असे आवाहन तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश भूषण काळे यांनी केले.
काळे म्हणाले, शिराळा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार शिराळा तालुका विधी सेवा समिती आणि शिराळा वकील संघटना यांच्यामार्फत १० एप्रिल रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन केले आहे. लोकअदालतीत जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होऊन जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने मिटवावीत, असे आवाहन लोकअदालतीत दावापूर्व प्रकरणे, धनादेश प्रकरणे, दिवाणी व फौजदारी प्रकरणे, बँकांची कर्ज प्रकरणे, दूरध्वनी, वीज, पाणीपट्टी कर आदी देयकांची विविध प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत. पक्षकारांनी त्यांची न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे तडजोडीने मिटवण्यासाठी लोकअदालतीमध्ये ठेवावीत व ती मिटवावीत, असे आवाहन दिवाणी न्यायाधीश काळे यांनी केले.