इस्लामपूरच्या खराडे भगिनींना राष्ट्रीय पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:27 IST2021-01-20T04:27:06+5:302021-01-20T04:27:06+5:30
इस्लामपूर : आष्टा येथील अण्णासाहेब डांगे अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्युत विभागाच्या सहायक प्राध्यापक ज्योती मोहन खराडे आणि इस्लामपूरच्या कर्मवीर भाऊराव ...

इस्लामपूरच्या खराडे भगिनींना राष्ट्रीय पुरस्कार
इस्लामपूर : आष्टा येथील अण्णासाहेब डांगे अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्युत विभागाच्या सहायक प्राध्यापक ज्योती मोहन खराडे आणि इस्लामपूरच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील भूगोल विभागाच्या सहायक प्राध्यापक डॉ. प्रीती मोहन खराडे या भगिनींना बेंगलोरच्या इन्स्टिट्यूट ऑफ स्कॉलर्स या नामांकित संस्थेचा राष्ट्रीय स्तरावरील ‘यंग रिसर्चर’ अवॉर्डने गौरविण्यात आले.
या पुरस्कारासाठी सादर केलेला संशोधन पेपरमधील उल्लेखनीय संशोधनाबद्दल त्यांना गौरविण्यात आले. या पुरस्काराबरोबरच या संस्थेचे सभासदत्व आणि आंतरराष्ट्रीय नियतकालिकाचे परीक्षक म्हणून मान्यता मिळाली आहे.
या यशाबद्दल ज्योती खराडे यांचे माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, अॅड. चिमण डांगे, कार्यकारी संचालक प्रा. आर. ए. कनाई, डॉ. जी. आर. कुलकर्णी, तर डॉ. प्रीती खराडे यांचे आर. डी. पाटील, सरोजमाई पाटील, प्राचार्य एच. टी. दिंडे, प्रा. एस के. माने यांनी अभिनंदन केले.
फोटो - १९०१२०२१-आयएसएलएम- इस्लामपूर गौरव न्यूज (दोन सिंगल फोटोे)