नरवीर उमाजी नाईक यांचा लढा स्फूर्तिदायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:48 IST2021-02-06T04:48:09+5:302021-02-06T04:48:09+5:30
इस्लामपूर : आद्य क्रांतिकारक नरवीर उमाजी नाईक यांनी परकीय, जुलमी इंग्रजी सत्तेविरुद्ध दिलेला लढा स्फूर्तिदायक असल्याची भावना नगरसेवक खंडेराव ...

नरवीर उमाजी नाईक यांचा लढा स्फूर्तिदायक
इस्लामपूर : आद्य क्रांतिकारक नरवीर उमाजी नाईक यांनी परकीय, जुलमी इंग्रजी सत्तेविरुद्ध दिलेला लढा स्फूर्तिदायक असल्याची भावना नगरसेवक खंडेराव जाधव यांनी व्यक्त केली.
राजारामनगर (ता. वाळवा) येथे आद्य क्रांतिकारक नरवीर उमाजी नाईक यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. जाधव यांच्या हस्ते प्रतिमा पूजन तसेच आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक कॉलनी, (राजारामनगर) नामफलक व झेंडा उद्घाटनही करण्यात आले. यावेळी युवक राष्ट्रवादीचे शहर संघटक सागर जाधव, फिरोज लांडगे, महेश जाधव उपस्थित होते.
युवक राष्ट्रवादीचे उमेश मंडले यांनी स्वागत केले. मित्र मंडळाचे अध्यक्ष अमोल मंडले यांनी आभार मानले. उपाध्यक्ष विकास मंडले यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी बाबुराव मदने, गोपीनाथ मंडले, प्रकाश मंडले, अशोक मंडले, रंजना मंडले, छाया मंडले, सुनंदा मदने, कांचन मंडले आदी उपस्थित होते.
फोटो ओळी- ०४०२२०२१-आयएसएलएम-उमाजी नाईक न्यूज
राजारामनगर (ता. वाळवा) येथे आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांची पुण्यतिथी व नामफलकाचे उद्घाटन खंडेराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उमेश मंडले, अमोल मंडले, विकास मंडले, बाबुराव मदने उपस्थित होते.