शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

नरेंद्र मोदींना निवडणुकांमध्येच स्वारस्य : जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 17:06 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जळगाव तसेच सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेच्या निकालावर ट्वीट केले. त्यांना केवळ निवडणूका व त्यांचे निकालच महत्वाचे वाटतात काय? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजी आमदार जयंत पाटील यांनी केला.

ठळक मुद्देनरेंद्र मोदींना निवडणुकांमध्येच स्वारस्य : जयंत पाटीलसाखराळे (ता. वाळवा) येथे मुख्यमंत्री पेयजल योजनेचे भूमीपूजन

इस्लामपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जळगाव तसेच सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेच्या निकालावर ट्वीट केले. त्यांना केवळ निवडणूका व त्यांचे निकालच महत्वाचे वाटतात काय? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजी आमदार जयंत पाटील यांनी केला.साखराळे (ता. वाळवा) येथे मुख्यमंत्री पेयजल योजनेचे भूमीपूजन तसेच बौद्ध समाजमंदिर, प्राथमिक शाळा खोल्यांची दुरुस्ती व रस्त्याच्या कामाचा आ.पाटील यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.

यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय पाटील, बाजार समितीचे माजी सभापती आनंदराव पाटील, सभापती सचिन हुलवान, उपसभापती नेताजीराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.आमदार पाटील म्हणाले, राज्याच्या मंत्री मंडळातील अनेक मंत्र्यांशी माझे चांगले संबंध आहेत. आपली सत्ता असताना आम्ही त्यांची कामे केली आहेत. कारण विकास कामामध्ये राजकारण आणायचे नसते हा आमच्यावरचा राजकीय संस्कार आहे. साखराळेसह तालुक्यातील अनेक पाणी पुरवठा योजनासाठी आम्ही पाठपुरावा केला असून ना. बबनराव लोणीकर यांच्या खास सूचनांवरून या योजना मंजूर झाल्या आहेत.बाळासाहेब पाटील म्हणाले, आपण सर्वजण काही वर्षांपासून भाजपाच्या केंद्र व राज्य सरकारचा वाईट अनुभव घेत आहोत. आता या मंडळींना घरी घालवून आपल्या माणसांना सत्तेत आणण्यासाठी सामान्य माणसांच्या दारात जावूया. भविष्यातील सर्व निवडणुका आघाडीकडूनच लढवल्या जातील, अशा सूचना आम्हाला वरिष्ठ नेत्यांकडून मिळाल्या आहेत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSangliसांगलीJayant Patilजयंत पाटील