नारायण राणेंचा पलूसमध्ये निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:31 IST2021-08-25T04:31:14+5:302021-08-25T04:31:14+5:30
पलूस : शिवसेनेचे पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल नारायण राणे यांचा पलूस तालुका शिवसेना, महाविकास ...

नारायण राणेंचा पलूसमध्ये निषेध
पलूस : शिवसेनेचे पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल नारायण राणे यांचा पलूस तालुका शिवसेना, महाविकास आघाडीकडून निषेध करण्यात आला.
यावेळी प्रशांत लेंगरे म्हणाले, नारायण राणे यांनी खालच्या स्तराला जाऊन टीका केली आहे. त्या टीकेचा पलूस तालुका शिवसेनेतर्फे आम्ही जाहीर निषेध करतो. त्यांनी खालच्या स्तरावर जाऊन टीका करणे बंद करावे. निव्वळ प्रसिद्धीसाठी त्यांची स्टंटबाजी सुरु आहे. त्यांना दुसरा कोणता विषय नाही. त्यामुळे ते सतत शिवसेनेवर टीका करतात. यापुढे अशी टीका झाल्यास शिवसैनिक जशास तसे उत्तर देतील.
यावेळी योगिता चव्हाण, नजमा मुजावर, उपतालुका प्रमुख दीपक शिंदे, गणेश माने, अक्षय होनकळसे, अक्षय माने, किरण माळी, जगदीश पवार यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.