नारायण देशमुख यांच्यामुळे इस्लामपुरात गुंडगिरीवर वचक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:26 IST2021-09-11T04:26:58+5:302021-09-11T04:26:58+5:30
इस्लामपूर : शहरासह पोलीस ठाण्याच्या ४० गावांच्या हद्दीत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी सर्वाधिक मोका कारवाया, तडीपारीचे गुन्हे, सीसीटीव्ही ...

नारायण देशमुख यांच्यामुळे इस्लामपुरात गुंडगिरीवर वचक
इस्लामपूर : शहरासह पोलीस ठाण्याच्या ४० गावांच्या हद्दीत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी सर्वाधिक मोका कारवाया, तडीपारीचे गुन्हे, सीसीटीव्ही अशा अनेक मार्गांनी खासगी सावकारी, गुंडगिरीवर वचक ठेवल्याने शहरवासीयांना शांततामय जीवन जगण्याचा आनंद अनुभवता आला, असे गौरवोद्गार ॲड. धैर्यशील पाटील यांनी काढले.
पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी इस्लामपूर येथील कार्यकाल यशस्वीपणे पूर्ण केला. त्यांची आर्थिक गुन्हे शाखेकडे बदली झाल्याबद्दल त्यांचा येथील ‘माणुसकीचं नातं’ प्रतिष्ठानतर्फे सपत्नीक सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रा. श्यामराव पाटील म्हणाले इस्लामपूर शहर परिसरांतील गुन्हेगारीला आळा घालून कडक कारवाया करण्यासाठी अतिशय निष्ठेने वेळ देऊन पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी प्रॉपर पोलिसिंग केले.
यावेळी माणुसकीचं नातं प्रतिष्ठानच्या नामफलकाचे अनावरण उद्योजक रणजित मंत्री, प्रा. श्यामराव पाटील, उद्योजक सर्जेराव यादव, ॲड. धैर्यशील पाटील, डॉ. प्रदीप शहा, प्रतिष्ठानचे प्रमुख संकल्पक उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या हस्ते झाले.
प्रतिष्ठानचे सचिव प्रा. महेश जोशी यांनी आढावा घेतला. यावेळी अध्यक्ष प्रा. डॉ. अशोक शिंदे, ॲड. विजय काईंगडे, उद्योजक दीपक कोठावळे यांनी मनोगत व्यक्त केले. गौतम रायगांधी यांनी आभार मानले. प्रा. डॉ. सुरज चौगुले यांनी सूत्रसंचालन केले. सुकेशिनी देशमुख, उद्योजक विजयकुमार पाटील, डॉ. प्रवीण पोरवाल, उद्योजक आनंदराव शेलार, विक्रम घाडगे उपस्थित होते. प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष उमेश कुरळपकर, विकास राजमाने, संपत वारके, अमित यादव, शुभम यादव, गणेश पोतदार यांनी संयोजन केले.
फोटो : १० इस्लामपूर ६
ओळ : इस्लामपूर येथे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांचा सत्कार रणजित मंत्री यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कृष्णात पिंगळे, डॉ. पी. टी. शहा, प्रा. श्यामराव पाटील, सुकेशिनी देशमुख, ॲड. धैर्यशील पाटील, सर्जेराव यादव उपस्थित होते.