नंदू नाटेकरांना पद्मश्री मिळायला हवा होता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:26 IST2021-07-29T04:26:41+5:302021-07-29T04:26:41+5:30
जागतिक स्तरावर क्रीडा क्षेत्रात पहिले विजेतेपद मिळविणारा व पहिला अर्जुन पुरस्कार मिळविणाऱ्या इतक्या गुणी खेळाडूला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करायला ...

नंदू नाटेकरांना पद्मश्री मिळायला हवा होता
जागतिक स्तरावर क्रीडा क्षेत्रात पहिले विजेतेपद मिळविणारा व पहिला अर्जुन पुरस्कार मिळविणाऱ्या इतक्या गुणी खेळाडूला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करायला हवे होते. देशासाठी व क्रीडा क्षेत्रासाठी त्यांनी दिलेले योगदान आपण कधीच विसरू शकणार नाही.
- डॉ. नितीन नायक, सांगली
आमच्या घरी आजाेबांपासून क्रीडा परंपरा चालत आली, मात्र नंदू नाटेकरांनी सांगलीचे, कुटुंबाचे तसेच देशाचे नाव गाजविले. खूप मोठे योगदान त्यांनी दिले. आमचे मामा देवीकुमार देसाई यांना ते आदर्श मानायचे. बॅडमिंटनइतकेच प्रेम त्यांनी सांगलीवरही केले.
- डॉ. श्रीनिवास नाटेकर, नंदू नाटेकरांचे धाकटे बंधू
दैवी खेळाची अनुभूती त्यांनी आम्हाला व तमाम क्रीडारसिकांना दिली. चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स् असा त्यांचा उल्लेख करावा लागेल. केवळ बॅडमिंटनपुरतेच नव्हे, तर सर्व खेळांमध्ये दीपस्तंभासारखी त्यांची शैली व जीवनप्रवास आहे.
- डॉ. शेखर परांजपे, सांगली
सांगली जिमखाना ही त्यांची कर्मभूमी होती. बॅडमिंटन खेळात त्यांनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे अनेक पराक्रम हे अविस्मरणीय आहेत. जिमखान्याचे खेळाडू व सांगलीकर म्हणून त्यांचा सतत अभिमान वाटत आला आहे. त्यांचे निधन क्रीडा क्षेत्रासाठी मोठी हानी आहे. - प्रा. पद्माकर जगदाळे, अध्यक्ष, सांगली जिमखाना