ताकारीत नानासाहेब महाडिक संस्थेतर्फे यशस्वीतांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:24 IST2021-03-20T04:24:09+5:302021-03-20T04:24:09+5:30

फोटो ओळी: ताकारी (ता. वाळवा) येथे वनश्री नानासाहेब महाडिक मल्टीस्टेट व वनश्री नानासाहेब महाडिक ग्रुप यांच्यावतीने प्रदीप पाटील, शंकर ...

Nanasaheb Mahadik Sanstha felicitates the winners | ताकारीत नानासाहेब महाडिक संस्थेतर्फे यशस्वीतांचा सत्कार

ताकारीत नानासाहेब महाडिक संस्थेतर्फे यशस्वीतांचा सत्कार

फोटो ओळी: ताकारी (ता. वाळवा) येथे वनश्री नानासाहेब महाडिक मल्टीस्टेट व वनश्री नानासाहेब महाडिक ग्रुप यांच्यावतीने प्रदीप पाटील, शंकर पाटील, दीपा पवार यांचा सत्कार करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्क

बोरगाव : ताकारी (ता. वाळवा) येथील वनश्री नानासाहेब महाडिक मल्टीस्टेट संस्थेच्यावतीने व्यवस्थापकीय संचालक रघुनाथ बागडी यांच्याहस्ते यशस्वीतांचा सत्कार करण्यात आला.

संस्थेचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांना इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन नवी दिल्ली या संस्थेचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. दह्यारी ग्रामपंचायतीचे नूतन उपसरपंच शंकर पाटील यांची निवड झाल्याबद्दल, तर वनश्री नानासाहेब महाडिक मल्टीस्टेट संस्थेच्या ताकारी शाखेचे व्यवस्थापक युवराज पवार यांची पुतनी दीपा पवार यांची टीसीएस या मल्टीनॅशनल कंपनीत निवड झाली, याबद्दल तिन्ही यशस्वीतांचा संस्थेच्यावतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी महादेव पोतदार, दीपक सूर्यवंशी, अरुण पवार, संजय माने, संजय भोपळे, तैयुब मोटलानी, सुनील बर्गे, प्रवीण हुबाले, शरद पाटील, धनाजी घाडगे आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Nanasaheb Mahadik Sanstha felicitates the winners