कृष्णा नदीवरील नागठाणे बंधारा पाण्याखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:19 IST2021-06-18T04:19:05+5:302021-06-18T04:19:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वाळवा : कोयना धरण परिसरासह वाळवा, पलूस तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत ...

कृष्णा नदीवरील नागठाणे बंधारा पाण्याखाली
लोकमत न्यूज नेटवर्क
वाळवा : कोयना धरण परिसरासह वाळवा, पलूस तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत गुरुवारी वाढ झाली आहे. नागठाणे (ता. पलूस) येथील बंधारा पाण्याखाली गेल्यामुळे शिरगाव, नागरिळे, नागठाणे गावांचा संपर्क तुटला आहे.
बुधवारी रात्रभर पाऊस कोसळत आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. नागठाणे बंधारा गुरुवारी दुपारी पाण्याखाली गेला असून, प्रशासनाने वाहतुकीसाठी पूल पूर्णत: बंद केला आहे. यामुळे वाळवा, नागठाणे, शिरगाव, पलूस, नागराळे, किर्लोस्करवाडीचा संपर्क तुटला आहे.
हाळभाग व कोटभाग जोडणाऱ्या ओढ्यावरील जुन्या फरशी पुलाच्या मच्छाला पाणी लागले आहे. याठिकाणी असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या मागे असलेल्या जातकर समाजाच्या झोपडपट्टीमध्ये पाणी शिरले आहे.