शिरगाव हायस्कूलमध्ये नागनाथ अण्णा जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:21 IST2021-07-17T04:21:34+5:302021-07-17T04:21:34+5:30

वाळवा : शिरगांव (ता. वाळवा) येथील क्रांतिमाता लक्ष्मीबाई नायकवडी विद्यालयात क्रांतिवीर डॉ. नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या ९९ व्या जयंतीदिनी ...

Nagnath Anna Jayanti celebration at Shirgaon High School | शिरगाव हायस्कूलमध्ये नागनाथ अण्णा जयंती साजरी

शिरगाव हायस्कूलमध्ये नागनाथ अण्णा जयंती साजरी

वाळवा : शिरगांव (ता. वाळवा) येथील क्रांतिमाता लक्ष्मीबाई नायकवडी विद्यालयात क्रांतिवीर डॉ. नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या ९९ व्या जयंतीदिनी माजी सरपंच राजाराम शिंदे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी राजाराम शिंदे यांनी नागनाथ अण्णा यांचे स्वातंत्र्यपूर्व लढ्यातील योगदान व स्वातंत्र्यानंतर रचनात्मक कार्य याविषयी माहिती दिली. यावेळी सरपंच दीपाली शिंदे, उपसरपंच प्रकाश पवार, हुतात्मा कारखान्याचे संचालक शंकर कापिलकर, तानाजी हवलदार, भास्कर माने, सुवर्णा चौगुले, मुख्याध्यापिका राजश्री कळसे-पाटील, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते. सांस्कृतिक विभाग प्रमुख वैशाली माळी व संजय होरे यांनी संयोजन केले. छाया माळी यांनी आभार मानले.

Web Title: Nagnath Anna Jayanti celebration at Shirgaon High School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.