शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायल इराणच्या अण्वस्त्र ठिकाणांवर हल्ले करण्याच्या तयारीत; अमेरिकन गुप्तचरांच्या दाव्याने खळबळ
2
मोठा खुलासा! हेर तारिफने दिलेल्या माहितीवरूनच पाकिस्तानने सिरसावर डागले होते क्षेपणास्त्र
3
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
4
Operation Sindoor : सुवर्ण मंदिरात एअर डिफेन्स गन तैनात केली होती? भारतीय सैन्याने दिली माहिती
5
वेगवान वाऱ्यासह कोसळलेल्या पावसानं ठाणे, रायगड, पालघरला झोडपलं; कोकण रेल्वेलाही फटका
6
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
7
मुसळधारेने दाणादाण,  राज्यात वीज पडून ४ ठार; मान्सूनपूर्व वादळी पावसाने राज्याला झोडपले
8
भारत-पाक संघर्षावेळीही ज्योती ‘आका’च्या संपर्कातच एनआयए, आयबीकडून चौकशीतून निष्पन्न
9
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ, मित्रांंसाठी खर्च कराल...
10
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
11
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
12
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
13
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
14
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
15
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
16
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
17
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
18
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
19
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड

न्यायालय आदेशाप्रमाणेच नागपंचमी

By admin | Updated: July 25, 2016 23:06 IST

शीतलकुमार यादव : शिराळा येथे अधिकाऱ्यांची सामूहिक बैठक

शिराळा : शिराळा येथे ७ आॅगस्ट रोजी साजरी होणारी नागपंचमी प्रशासन व नागरिकांच्या समन्वयाने शांततेत पार पाडावी, यासाठी शासन यंत्रणा सज्ज झाली असून, उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे ही नागपंचमी साजरी करावी, असे आवाहन प्रभारी प्रांताधिकारी तथा तहसीलदार शीतलकमार यादव यांनी केले. येथील तहसील कार्यालय सभागृहात नागपंचमी नियोजनासाठी आयोजित सर्वपक्षीय, नागरिक, शासकीय अधिकारी यांच्या बैठकीत ते बोलत होते.सुरुवातीस मागील वर्षाच्या बैठकीचा आढावा घेतला. यावेळी प्रभारी प्रांताधिकारी यादव म्हणाले की, प्रथम नगरपंचायत म्हणून ही नागपंचमी साजरी होत आहे. सर्व शहरातील गटारी, मिरवणूक मार्ग, अंबामाता मंदिर परिसर याची स्वच्छता चालू असून औषध फवारणी केली जाणार आहे. शुद्ध पाणी पुरवठा, घरा-घरामध्ये मेडिक्लोरचे वाटप, पथदिव्यांची दुरुस्ती, स्टॉलधारकांना जागा वाटप आदी कामे करण्यात येणार आहेत. सर्व शासकीय यंत्रणेच्या समन्वयासाठी कंट्रोल रूम ठेवण्यात येणार आहे. मिरवणुकीसाठी सर्व नागराज मंडळांनी परवानगी घ्यावी. अन्न-औषध प्रशासन विभागाने विषबाधा टाळण्यासाठी सर्व हॉटेल व्यावसायिकांची तपासणी करावी. याअगोदर शासन यंत्रणेकडून काही चुका झाल्या असतील, तर त्यात यावेळी नक्की सुधारणा करू. जेणेकरून भाविक-नागरिक यांची गैरसोय होणार नाही. नागपंचमी शांततेत पार पाडण्यासाठी नागरिकांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून सहकार्य करावे. न्यायालयाचा अवमान होणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रशासनाच्या सर्व विभागातील अधिकाऱ्यांनीही जो आराखडा ठरविला आहे, तो कागदावरच न राहता सर्व अंमलात आणावा, असा आदेशही देण्यात आला आहे. नागपंचमीसाठी वनक्षेत्रपाल, कर्मचारी आदी १७८ अधिकारी, कर्मचारी नियुक्त केले आहेत. दहा गस्तीपथके सध्या कार्यरत आहेत. नागपंचमीदिवशी मिरवणुकीसाठी नऊ पथके असणार आहेत. नागपंचमीवेळी न्यायालयाच्या आदेशाची तसेच न्यायिक कायद्याच्या माहितीसाठी पथनाट्य, पोस्टर लावणे, रॅली आदीचे आयोजन करण्यात येणार आहे.गटविकास अधिकारी यशवंत भांड म्हणाले की, नागपंचमीदिवशी नऊ आरोग्य पथके, ग्रामीण रुग्णालयात खास कक्ष, सांगली येथील एक पथक असणार आहे. सध्या ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात ११२६ सर्पदंशावरील लसी, ८८४ श्वानदंशावरील लसी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीस एस. एल. दाभोळे, डी. डी. शेटे, डी. के. यमगर, पं. स. सदस्य लालासाहेब तांबीट, बसवेश्वर शेटे, संभाजी गायकवाड, संतोष हिरुगडे, दिलीप कदम, राम पाटील, नायब तहसीलदार राजाराम शिद, सहायक पोलिस निरीक्षक प्रभाकर गायके, भगवान शिंदे, वसंत कांबळे, महादेव कुरणे, सत्यजित कदम, एल. एस. घोरपडे, नाग मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. नायब तहसीलदार के. जे. नाईक यांनी आभार मानले. (वार्ताहर)प्रशासन सज्जपोलिस विभागाकडून एक उपविभागीय पोलिस अधिकारी, १२ पोलिस निरीक्षक, २२ सहा. पोलिस निरीक्षक, २६१ पोलिस, २५ महिला पोलिस, ५० वाहतूक शाखा पोलिस, १० व्हिडीओ कॅमेरे, ध्वनीमापन यंत्रे अशी व्यवस्था राहणार आहे. यावेळी वीज वितरण कंपनी, एसटी आगार, सार्वजनिक बांधकाम विभाग आदींकडून व्यवस्था करण्यात येणार आहे. त्याची माहिती देण्यात आली.